दृकश्राव्य स्वरुपामध्ये ओवी दृश्य स्वरूपात पाहण्यास मिळते आणि त्याचवेळी ती सुमधूर स्वरांमध्ये ऐकायला मिळते. या माध्यमातून ३५ तासामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरीचे पारायण डिजिटल माध्यमातून घडणार आहे. ही दृकश्राव्य ज्ञानेश्वरी ‘साखरे महाराज’ या युट्युब चॅनेल वर विनामूल्य उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यशोधन साखरे यांनी ‘लोकमत’ला दिली. हा प्रकल्प श्रीगुरु साखरे महाराज प्रासादिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ या संस्थेच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहे. आळंदी कार्तिकी वारीमध्ये एकादशीच्या दिवशी म्हणजेच ११ डिसेंबर रोजी किसनमहाराज साखरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओद्वारेही विश्वाला खुली झाली आहे. विश्वात्मक देवाची प्रार्थना करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान हे इंटरनेट रेडिओद्वारे खऱ्या अर्थाने विश्वव्यापी झाले आहे.
जगाच्या पाठीवर कोठेही २४ तास ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओ ऐकता येणार आहे, अशी माहिती यशोधन साखरे यांनी दिली. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांनी व्रतस्थ आणि सांप्रदायिक पद्धतीने केलेल्या सांप्रदायिक आणि शुद्ध अशा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ ँ३३स्र२://१ं्िरङ्म.ॠं१ीिल्ल/ह्ण्र२३ील्ल/ल्लि८ंल्ली२ँ६ं१्र/६ठं७इह५ङ किंवा ँ३३स्र२://९ील्लङ्म.ऋे/ल्लि८ंल्ली२ँ६ं१्र या संकेतस्थळावर घेता येणार आहे.