पुणे : अपयश लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी कुटूंबावर टीका केली जात आहे. आता या रांगेत मलाही घेतले आहे. पण आमच्यावर कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. मोदींना घराचा अनुभव नाही. आणि हे दुसऱ्याच्या घराची चौकशी करत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले. तसेच भाजपचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे वक्यव्यही पवार यांनी यावेळी केले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत, उल्हास पवार, प्रविण गायकवाड, अंकुश काकडे, रमेश बागवे, चेतन तुपे आदी उपस्थित होते. मोदी यांच्याकडून सातत्याने गांधी व पवार कुटूंबियांवर होत असलेल्या टीकेचा पवार यांनी यावेळी खरपुस समाचार घेतला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी मोदींना ह्यतुम्ही काय केले हे सांगाह्ण असे आव्हान दिले.
पवार म्हणाले, विकासाचे मॉडेल दाखवून मोदींनी सत्ता मिळविली. पण त्यानंतर पाच वर्षात एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. त्यांना आपला शब्द न पाळल्याने शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या. आम्ही कर्जमाफी केली पण हे श्रीमंतांचीच थकबाकी भरत आहेत. विकासावर न बोलता आपले अपयश लपविण्यासाठी प्रत्येक भाषणातील २० मिनिटे ते काँग्रेस नेतृत्वाला शिव्या देत आहेत. पण स्वत: काय केले हे सांगण्यासाठी मोदींकडे काहीच नाही. गांधी घराण्याच्या लाईनमध्ये आता मलाही आणत शिव्या देऊ लागले आहेत. आम्ही आमच्या आईच्या संस्कारात वाढलो आहेत. पण मोदींना घराचा अनुभव नाही. जे आहेत ते कुठे आहे माहीत नाही. कधीतरी फोटो दिसतो. आणि दुसºयाच्या घराची चौकशी करतात. आमची चिंता करू नका. कितीही टीका करा. आमच्या अंगाला भोके पडत नाहीत. आता परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. भाजपचा पराभव करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून काम करा, असे आवाहन पवार यांनी केले.ते घबाड गेले कुठेराफेल करारातील माहिती गुप्त असल्याचे मोदी सांगतात. पण त्या कराराच्या फाईलचे फोटो बाहेर येतात. हे देशाचे कसे संरक्षण करणार. विमानांची किंमत ३५० कोटींवरून १६५० कोटी केली. ज्यांनी कधी कागदाचे विमान केले नाही, त्यांना विमान बनविण्याचे काम दिले आहे. हे मधले घबाड गेले कुठे?, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
मग कुलभूषण जाधव का सोडविले नाहीपंतप्रधान मोदी हे प्रत्येक गोष्टीला मी केले मी केले अशा अविभार्वात बोलत आहेत. पण ही ५६ इंची छाती कुलभुषण जाधवला असून का सोडवून आणू शकली नाही. सगळं मीच करतोय असे चित्र निर्माण करत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.