शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह करा सहकुटुंब अथर्वशीर्षपठण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 10:03 PM

लोकमत ‘ती'चा गणपती’ उपक्रम- प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत अथर्वशीर्ष पठणाची संधी मिळणार आहे..

ठळक मुद्देसामूहिक अथर्वशीर्ष पठणातून समूहशक्तीचा अनोखा जागर केला जाणार

पुणे : ‘लोकमत’च्या वतीने कोरोनाविरुद्धच्या लढाईत मनाला उमेद देण्यासाठी प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासोबत सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा अनोखा कार्यक्रम आयोजितकरण्यात आला आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता लोकमत फेसबुक पेजवर यामध्ये सहभागी होता येणार आहे.

लोकमत ‘ती'चा गणपती’ उपक्रमांतर्गत प्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांच्यासमवेत अथर्वशीर्ष पठणाची संधी मिळणार आहे. सामूहिक अथर्वशीर्ष पठणातून समूहशक्तीचा अनोखा जागर केला जाणार आहे. रोझरी फाऊंडेशन, कॅलीक्स ग्रुप आॅफ कंपनीज आणि काका हलवाई स्वीट सेंटर यांच्या सहयोगाने हा उपक्रम होणार आहे.

‘‘गणेशोत्सव काळात घराघरात श्रीगणरायाचे आगमन झाल्यानंतर अथर्वशीर्षाच्या तीन, सात, अकरा आणि एकवीस आवर्तनांतून गजाननाला वंदन केले जाते. तूच प्रत्यक्ष आदितत्त्व आहेस, तूच केवळ (सर्व जगाचा) निर्माता आहेस. तूच केवळ धारण करणारा आहेस. तूच केवळ संहार करणारा आहेस. तूच खरोखर सर्व जगाचा संहारक आहेस... तूच खरंतर सर्व ब्रह्म आहेस, तू प्रत्यक्ष आत्मतत्त्व आहेस... असे अथर्वशीर्षाचे संपूर्ण सार आहे. आधी गणेशाची स्तुती मग ध्यान अशी या स्तोत्राची रचना आहे.‘लोकमत’ने महिलाशक्तीला सन्मान देण्यासाठी ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते केले जातात. हाच समूहशक्तीचा जागर अथर्वशीर्ष पठणाने होणार आहे.प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुरेल आवाजासोबत अथर्वशीर्षाचे पठण करताना आपल्या मनात उत्साह आणि उल्हासाची कंपने निर्माण होतील. त्यातून कोणत्याही संकटाविरुद्ध लढण्याची शक्ती मिळेल.

टॅग्स :PuneपुणेShankar Mahadevanशंकर महादेवनGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवLokmat Eventलोकमत इव्हेंट