शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

आमिषाला बळी पडू नका

By admin | Published: May 24, 2017 4:05 AM

इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन आणि गुणवत्तेनुसार होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन आणि गुणवत्तेनुसार होणार आहेत. त्यामुळे प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रवेशप्रक्रियेबाहेरील कोणत्याही घटकाने आमिष दाखविल्यास त्याला बळी पडू नका. तसेच, काही खासगी कोचिंग क्लासेसकडूनही प्रवेश अर्ज भरण्याबाबत दिशाभूल केली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कशालाही बळी न पडता शाळेत प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने केले आहे.काही वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या प्रक्रियेत भाग १ व भाग २ असे दोन अर्ज भरावे लागणार आहेत. भाग १ भरण्याची प्रक्रिया येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. मागील वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेसह सायबर कॅफे, कोचिंग क्लासेस किंवा घरबसल्याही आॅनलाईन अर्ज भरता येत होते; मात्र यंदा केवळ शाळांमध्येच अर्ज भरून घेतले जाणार आहेत. आॅनलाईन नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना या प्रक्रियेतून प्रवेश मिळणार नाही. प्रवेशप्रक्रियेच्या काही जण इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवितात. काही कोचिंग क्लासेसकडूनही काही ठराविक महाविद्यालयांचे पसंतीक्रम देण्याबाबत आग्रह धरला जातो. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांची फसवणूक होते. त्यांना घराजवळच्या किंवा आपल्या गुणवत्तेनुसार चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. आॅनलाईन प्रक्रियेमध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अर्ज भरावेत, असे आवाहन समितीने केले आहे.राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवेश समितीने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ झोनअंतर्गत विविध ठिकाणी मार्गदर्शन केंद्रे सुरू केली आहे. राज्य मंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र केंद्रे दिली.राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी झोननिहाय मार्गदर्शन केंद्र झोन १ - पुणे शहर विभाग झोन केंद्र - स. प. महाविद्यालयमार्गदर्शन केंद्र - १. नू. म. वि. मुलांचे विद्यालय, अप्पा बळवंत चौक२. स. प. महाविद्यालय३. शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ४. एस. व्ही. युनियन कनिष्ठ महाविद्यालयझोन २ - कर्वेनगर/कोथरूड विभागझोन केंद्र - आबासाहेब गरवारे महाविद्यालयमार्गदर्शन केंद्र - १. एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, कर्वे रस्ता२. आबासाहेब गरवारे महाविद्यालयझोन ३ - पर्वती/धनकवडी/स्वारगेट विभागझोन केंद्र - मुक्तांगण हायस्कूल, सहकारनगरमार्गदर्शन केंद्र - १. श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती२. कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, धनकवडी३. मोलेदिना हायस्कूल झोन ४- सिंहगड रस्ता विभागझोन केंद्र - वसंतराव सखाराम सणस विद्यालय, वडगावमार्गदर्शन केंद्र - १. वसंतराव सखाराम सणस विद्यालय२. रावसाहेब पटवर्धन विद्यालयझोन ५- कॅम्प/येरवडा विभागझोन केंद्र - नौरोसजी वाडिया कॉलेजमार्गदर्शन केंद्र - १. पूना कॉलेज, गोळीबार मैदान२. नौरोसजी वाडिया महाविद्यालय३. नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, येरवडाझोन ६ हडपसर विभागझोन केंद्र - आकुताई कल्याणी साधना विद्यालय, हडपसरमार्गदर्शन केंद्र - १. साधना विद्यालय२. अण्णासाहेब मगर महाविद्यालयझोन ७ - शिवाजीनगर/औंध/पाषण विभागझोन केंद्र - मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगरमार्गदर्शन केंद्र - १. फर्ग्युसन महाविद्यालय२. मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर३. बी. आर. घोलप विद्यालय, सांगवी४. आलेगावकर हायस्कूल, खडकीझोन ८ - पिंपरी भोसरी विभागझोन केंद्र - जयहिंद महाविद्यालय, पिंपरीमार्गदर्शन केंद्र - १. नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपरी गाव२. श्री भैरवनाथ विद्यालय, भोसरी३. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडीविशेष आरक्षण कोणासाठी? १.कला व सांस्कृतिक२. चित्रकला३. क्रीडा४. बदलीने आलेल्या राज्य शासन, केंद्र शासन किंवा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पाल्य५. आजी-माजी सैनिकांचे पाल्य६. स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य७. दिव्यांग८. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त