येरवडा : वनाझ ते रामवाडीपर्यंतच्या मेट्रो मार्गासाठी पूर्वीचा मार्ग बदलून कल्याणीनगर येथून डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातून नेण्यात येणाऱ्या मार्गास स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला आहे. या विरोधासाठी शनिवारी मानवी साखळी करण्यात आली होती.
मेट्रोचा पूर्वी गुंजन चौकातून आगाखान पॅलेसजवळून पुढे रामवाडीकडे मार्ग होता. परंतु, राष्टÑीय स्मारकाच्या १०० मीटर आत तो मार्ग करता येणार नाही, म्हणून हा मार्ग बदलून कल्याणीनगरकडून करण्याचे प्रस्तावित आहे. हा मार्ग गुंजन चौकातून मुठा नदीपात्रातून डॉ. सालीम अली अभयारण्यातून पुढे जाणार आहे. त्यामुळे अभयारण्यातील जैवविविधता आणि पक्ष्यांचे अधिवास नष्ट होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि कल्याणीनगर येथील रहिवाशांनीदेखील त्यास विरोध दर्शविला. सुमारे ५ हजार नागरिकांनी विरोधात निवेदन दिले आहे.जैवविविधता होईल नष्टया अभयारण्यात सुमारे विविध पक्षी, वनस्पती, कीटकांच्या २०० प्रजाती आढळून येतात. त्यामुळे येथील जैवविविधता या मार्गामुळे नष्ट होत आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमी त्यास विरोध करीत आहेत.कल्याणीनगरमधून मेट्रोला मिळेल कमी प्रतिसादगुंजन चौकातून मेट्रो पुढे भुयारी गेली तर नागपूर चाळ, नगर रोड या ठिकाणच्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. परंतु, कल्याणीनगर येथून मेट्रो मार्ग केला तर तिथे प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे कल्याणीनगर येथील रहिवाशांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे.