लाटेवर जावू नका भरती येते तशी ओहोटी पण येते: अजित पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:13 PM2018-04-11T17:13:50+5:302018-04-11T19:05:04+5:30

हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या ओहोटीला सुरुवात झाली आहे. २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार आले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय करून पक्षाला साथ द्या असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Do not go on wave : Ajit Pawar | लाटेवर जावू नका भरती येते तशी ओहोटी पण येते: अजित पवार 

लाटेवर जावू नका भरती येते तशी ओहोटी पण येते: अजित पवार 

Next
ठळक मुद्देदेशात पेट्रोल, डिझेल फक्त महाराष्ट्रात महागसरकार शाळा उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे.

राजगुरुनगर : समुद्राला भरतीची लाट येते त्याप्रमाणे ओहोटी देखील येत असते. ही गोष्ट राजकारणातही तंतोतत लागू होते. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची लाट आली होती. मात्र, त्यामुळे लाटेवर जावू नका, भरती येते तशी ओहोटी पण येते. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या ओहोटीला सुरुवात झाली आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार आले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला साथ द्या असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 
   राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राजगुरुनगर येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील,जयदेव गायकवाड, राम कांडगे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, रोहित पवार, यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, स्पर्धेचे युग असल्याने तुमच्या विद्वत्तेला महत्व असताना सरकार शाळा उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कामगार विरोधी कायदे या सरकारने केले आहे. या सरकारमध्ये अनेक घोटाळे झाले आहे. देशात पेट्रोल, डिझेल फक्त महाराष्ट्रात महाग आहे. घरगुती गॅस ८०० रुपयांच्या पुढे गेला आहे. घर कसे चालवायचे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला सतावत आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या सर्व परिस्थितीला भाजप सरकार जबाबदार आहे, म्हणून आम्ही हल्लाबोल आंदोलन करत आहोत. दिलीप मोहिते पाटील म्हणाले, मोदींच्या वादळात तालुक्यातील जनता भरकटली. याची मोठी किमत मोजावी लागली आहे. तालुक्यातील तीन धरणांचे मात्र, पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडला देण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी व आभार तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी मानले. 

Web Title: Do not go on wave : Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.