पुणे - आदिवासींमध्ये स्त्री-भ्रूणहत्या नाहीत. कदाचित अज्ञानही त्यांच्या जमेची बाजू आहे, असे म्हणता येईल. त्यांच्यामध्ये हुंडाबळी नाहीत. गर्भवती मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार केला जातो. आपण संकुचित विचार करतो. तेथे कोणीही मूल उकिरड्यावर फेकत नाही. त्यामुळेच मेळघाटामध्ये अनाथालय सुरू करण्याची वेळच आमच्यावर आली नाही, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिली. या कामामध्ये स्मिता कोल्हे यांचे योगदान महत्त्वाचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील निवृत्त शिक्षक सुधीर आगाशे यांच्या ८० व्या वर्षपूर्तीनिमित्त बैरागड विकास, उत्थान, हिवरा एज्युकेशन सोसायटी, श्री रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम, समवेदना, कुष्ठरोग निवारक संघ, अभय अभियान, आयडेन्टिटी फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, कृतज्ञता ट्रस्ट, विनायक नेत्रालय अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या १५ संस्थांना मिळून आठ लाख रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले. त्याप्रसंगी कोल्हे बोलत होते. उल्हास पोहरे आणि श्रीकांत काकडे या वेळी उपस्थित होते.कोल्हे म्हणाले, ‘शेती श्रम, मालकाचे कष्ट आणि तरुणांचे हात मागते. माझा उच्चशिक्षित मुलगा या शेतकºयांसमवेत शेतीमध्ये राबतो. त्याच्यासह सर्वांच्या कष्टातून मेळघाटात शेती फुलली. विदर्भामध्ये यवतमाळ, अमरावती येथे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या असल्या तरी मेळघाटाचा त्यापासून अपवाद राहिला. मेळघाटात शेतकरी आत्महत्या नाहीत.’आगाशे म्हणाले, ‘जीवनात सगळेच काही मनासारखे घडले असे नाही. पण, त्याबद्दल खंत न बाळगता आयुष्याने मला पुष्कळ दिले असेच वाटते. समाजाने मला जे दिलेत्यातूनत कृतज्ञता निधी प्रदान करताना मनस्वी समाधान लाभत आहे.’
मेळघाटामध्ये अनाथालय नको - डॉ. रवींद्र कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 3:49 AM