शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बेडच्या त्रुटीचा ‘नियोजना’ला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2016 12:46 AM

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावांचा समावेश असून, साधारण १ लाख लोकसंख्या असतानाही फक्त सहा बेडची व्यवस्था

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ गावांचा समावेश असून, साधारण १ लाख लोकसंख्या असतानाही फक्त सहा बेडची व्यवस्था असल्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेला येणाऱ्या लाभार्थींची गैरसोय होत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, धानोरे, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी, सणसवाडी, कोरेगाव भीमा, कासारी, शिवतक्रार, म्हाळुंगी, टाकळी भीमा, बुरंजवाडी, दरेकरवाडी, वाडा पुनर्वसन, शिक्रापूर, डिंग्रजवाडी या १६ गावांचा समावेश आहे.सुमारे १ लाख लोकसंख्या आहे. तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून अवघे सहा बेडच्या व्यवस्थेचेच आहे. या बेडच्या संख्येनुसार दर आठवड्याच्या कुटुंब नियोजनाच्या कॅम्पमध्ये फक्त सहाच शस्त्रक्रिया घेतल्यास वर्षाला अवघ्या २८८ होतील.या बेडच्या संख्येनुसार शस्त्रक्रिया केल्यास उद्दिष्टपूर्ती तर होणार नाहीच. अनेक लाभार्थी प्रतीक्षा यादीत राहतील. जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या बेडच्या समस्या हे वास्तव आहे.तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडच्या संख्येनुसार किंवा जास्त कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या तरीही या लाभार्थींच्या शस्त्रक्रियेपूर्वी, शस्त्रक्रियेदरम्यान व नंतर त्यांची शारीरिक काळजी आरोग्य खाते घेत असते. त्यांना आर्थिक लाभही जातो, असे वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थींनी बेडचा विचार न करता कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया २ अपत्यानंतर स्त्री किंवा पुरुषांनी मोफत शासकीय आरोग्य केंद्रात करून घेण्याचे आवाहन डॉ. घोरपडे यांनी केले आहे. (वार्ताहर)