पुुणे : शिक्षण विभागाचे लेखी आदेश असतानाही शहरातील खासगी शाळांकडून पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठीचे बंधन घातले जात आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, शाळेचा निकाल हातात देण्याआधीच पुढच्या इयत्तेसाठीचे साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. शाळेकडून जास्तीत जास्त साहित्य खपविण्यासाठी वेगगेवळया क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. त्यात प्रत्येक वर्षीचा गणवेश बदलण्यापासून वह्यांचे रंग बदलण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे पालकांवर घरात असलेले शैक्षणिक साहित्य फेकून देण्याची वेळ आली आहे. तर, या शाळेने पालकांना विकलेल्या याच साहित्याची ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष बाजात जाऊन चौकशी केली असता, २० ते २५ टक्के कमी दराने हे साहित्य मिळत असल्याचेही समोर आले आहे. शिक्षण विभागाचे कानावर हात खासगी शाळांमधील शालेय साहित्य विक्रीस राज्य शासनानेच २००४मध्ये एका परिपत्रकाद्वारे मज्जाव केलेला आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून शाळांकडून सक्ती केली जात आहे. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील सर्वच शाळांमध्ये हा प्रकार सुरू असताना शालेय शिक्षण विभाग मात्र स्वत: कारवाई करण्यास तयार नाही. एखद्या पालकाने तक्रार केल्यास कारवाई करण्यास आपण तयार असल्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी खासगीत सांगतात. मात्र, एखाद्या पालकाने तक्रार केल्यास आणि त्याचे नाव पुढे आल्यास शाळेकडून संबंधिताला त्रास झाल्यास त्याची जबाबदारी घेण्यास मात्र शिक्षण विभाग तयार नाही. त्यामुळे शहरात असे गैरप्रकार सुरू असतानाही शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करून या प्रकरांना खतपाणीच घालत असल्याचे दिसून येते. शालेय साहित्य शाळांमधूनच घेतले पाहिजे, अशी सक्ती करणे खूप चुकीचे आहे. ही पुस्तके शाळेबाहेरील विक्रेत्यांकडे कमी किमतीत मिळत असतानाही आम्हाला विनाकारण चढ्या दराने घ्यावी लागतात. ही शाळांकडून होणारी लूट असून, त्याचा भुर्दंड आम्ही का सहन करायचा ?- पालक >रंग बदलून माथी मारले जातेय साहित्य शैक्षणिक अध्यापन हे पहिले कर्तव्य असलेल्या शाळांकडून पैसे उकळण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. या खासगी शाळांकडून प्रत्येक इयत्तेच्या मुलांसाठी वेगळ्या रंगाचा गणवेश, वेगळ्या रंगाच्या वह्या, वेगळ्या रंगाचे बूट तसेच मोजे दिले जात आहेत. त्यामुळे एखाद्या पालकाकडे संबंधित मुलासाठी घेतलेले यापैकी कोणतेही साहित्य शिल्लक आणि वापरण्यायोग्य असले, तरी पुढच्या इयत्तेत ते वापरण्यास शाळेकडून मनाई होत असल्याने असे साहित्य पालकांना भंगारात विकावे लागत आहे. या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पाल्यांच्या काही वह्या तसेच मागील वर्षीचे दप्तर सुस्थितीत होते. ते तिसरीतही सहज वापरता येणे शक्य होते; मात्र दुसरीत असताना दप्तराचा रंग काळा होता, आता तिसरीसाठी लाल रंगाचे दप्तर शाळेने निश्चित केले आहे. त्यामुळे पालकांना पुन्हा ४५० रुपये घालवून नवीन दप्तर घ्यावे लागले.>तिसरीसाठी १५ पुस्तके २० वह्या एकीकडे राज्य शासनाकडून मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात असतानाच; दुसरीकडे शाळांकडून मात्र शैक्षणिक साहित्य खपविण्याच्या नावाखाली अभ्यासाचे ओझे वाढविले जात असल्याचे या शालेय साहित्य विक्रीवरून समोर आले आहे. अवघ्या तिसऱ्या इयत्तेत गेलेल्या या मुलासाठी अभ्यासाठी तब्बल १४ पुस्तके देण्यात आली असून, वर्षभरासाठी २० वह्या पालकांना देण्यात आल्या आहेत. या सर्वांची किंमत तब्बल १,५०० रुपये आहे.
पुण्याचे पाणी कदापिही पळवू देणार नाही
By admin | Published: April 26, 2016 12:59 AM