शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
4
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
6
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
7
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
8
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
9
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
10
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
11
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
12
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
13
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
14
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
15
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
16
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
17
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
18
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
19
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
20
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पालखीचित्रण नको!

By admin | Published: July 09, 2015 2:24 AM

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हवाई चित्रीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करण्याचा देवस्थानने घेतलेला निर्णय आता रद्द करावा लागणार आहे.

आळंदी : ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हवाई चित्रीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे चित्रीकरण करण्याचा देवस्थानने घेतलेला निर्णय आता रद्द करावा लागणार आहे.जिल्हाधिकारी सौरव राव यांनी पुणे व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जारी केलेल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, महत्त्वाची धरणे, अनेक केंद्रीय संस्था आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात येणाऱ्या चित्रीकरणाचा दहशतवादी कारवायासाठी उपयोग केला जाण्याची शक्यता आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी पुणे ग्रामीण हद्दीतील पौड, मावळ, मुळशी तसेच इतर परिसरात झालेल्या लग्नसमारंभात एका मॅनेजमेंट कंपनीकडून छायाचित्रणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर झाल्याची गोपनीय माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. कंपनीने कोणतीच परवानगी घेतली नसल्याचेही उघड झाले आहे. > ड्रोन कॅमेऱ्याद्वारे महत्त्वाची धार्मिक स्थळे, संस्था, धरणे, सोहळा व सभा व इतर महत्त्वाची ठिकाणी याचे छायाचित्रीकरण होऊन त्याचा दुरुपयोग होवू शकतो.देहू व आळंदी येथील पालखी सोहळा असून, त्यात छायाचित्रणाकरिता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होण्याची शक्यता आहे. > त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करणाऱ्या संस्थांनी याबाबतची पूर्वमाहिती देणे आवश्यक आहे. अशा संस्थांनी सात दिवसांपूर्वी संबंधित पोलीस ठाण्याकडून रीतसर परवानगी घ्यावी. > यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुरेश जाधव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४ नुसार ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात येणाऱ्या चित्रीकरणास प्रतिबंध केला आहे.