Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: October 9, 2024 01:35 PM2024-10-09T13:35:31+5:302024-10-09T13:36:03+5:30

देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो, त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे अजित पवारांनी सांगितले

Do not pay attention to the criticisms of opponents; No plan will be closed, Ajitdad assured | Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

पिंपरी : राज्याच्या तिजोरीत खडखडाट, राज्य दिवाळखोरीत निघाल्याची टीका विरोधक करत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका मी राज्याचा दहावा अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र राज्य मजबूत असून आर्थिक परिस्थिती मजबूत आहे. देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने लाडकी बहीणसह कोणतीही योजना बंद करण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी आहे. त्यात शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे मूलभूत गरजाचा पोहचवता आले पाहिजे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सुविधा पुरविताना ताण येत आहे. राज्याच्या विकासाचे इंजिन म्हणून शहराकडे पाहिले जात. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

कायदा-सुव्यवस्था राखा; पोलिसांना सुचना...

अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधीच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना आयुक्तांना दिली. राहिलेली कामे जोमाने होतील, मेट्रोचे कामे लवकर कशी होतील, याकडे पाहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. नागरिकांना मोकळेपणाने फिरता आले पाहिजे. कोणाकडूनही चुक होता कामा नये, दहशत, गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचना पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांची विचारसरणी अंगिकरून आपण समाजात वावरले पाहिजे. देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य करत असताना सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. 

या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन... 

बोपखेल येथे मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण, पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने स्थायी आदेश पुस्तिकेचे प्रकाशन व नवीन शासकीय वाहनांना हिरवा झेंडा दाखविण्याचा कार्यक्रम होणार आहे. इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल (आयसीसीसी)चे लोकार्पण, निगडी प्राधिकरण येथे हरित सेतू विषयक कामांचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील पवना नदीवर उभारलेल्या पुलाचे लोकार्पण, रक्षक चौकात सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर भुयारी मार्ग (सबवे ) उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प टप्पा एकचे शुभारंभ, मुळा नदीवर सांगवी ते बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण झाले. पिंपरीत माता रमाई स्मारकाचे काम हाती घेण्याची सूचनाही पवार यांनी केली.

Web Title: Do not pay attention to the criticisms of opponents; No plan will be closed, Ajitdad assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.