शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

धर्मनिरपेक्षतावाद्यांना भावना नाहीत का? जावेद अख्तर यांचा सवाल : शबाना आणि अख्तर यांच्याशी गप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 2:50 AM

शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला.

पुणे : शबाना आणि मी एकमेकांना कधी भेटलो ते आता आठवतही नाही. दोन्ही कुटुंबांचा अनेक वर्षांचा ॠणानुबंध आहे. एकमेकांवरील अतूट प्रेम आणि विश्वासाच्या मैत्रीपूर्ण नात्यावर वैवाहिक जीवनाचा प्रवास सुखकर आणि रुचकर झाला. आमच्यातही अनेकदा मतभेद होतात; मात्र आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो, प्रोत्साहन आणि भक्कम पाठिंबा देतो, असा गीतकार आणि लेखक जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपल्या सुखी संसाराचा मंत्र सांगितला. ‘एक बीवी, दो टीव्ही’ हे आमच्या सुखी संसाराचे गुपित असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. ‘आजकाल लहानसहान गोष्टींवरून अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. मात्र, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीयत्व जपणाºयांच्या भावनांचे काय?’ असा सवालही अख्तर यांनी उपस्थित केला.पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये शबाना आझमीआणि जावेद अख्तर यांचे ‘मायस्टोरी, अवर स्टोरी’ हे चर्चासत्र रंगले. त्यांची ‘स्टोरी’ जाणून घेण्यासाठी सभागृहात एकच गर्दी झाली होती. या वेळी या द्वयीने लहानपणापासूनचे संस्कार, कलाक्षेत्रातील प्रवास, समाजातील बदलती स्थिती, विचारसरणी याबाबत खुलेपणाने मते नोंदवली.अख्तर म्हणाले, ‘‘लहानपणी जे शिकवले जाते, त्याचा मनावर खोलवर परिणाम होत असतो. मला लहानपणापासून कधीच धर्म शिकवला गेला नाही. धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, राष्ट्रीयता हीच मूल्ये संस्कारांतून रुजली. या मूल्यांना धक्का लागला तर त्रास होतो. मुलांवर लहानपणापासून राष्ट्रीयत्व, सामाजिक बांधिलकी, कला आदी संस्कार झाले पाहिजेत. त्यातूनच माणूस घडतो.’’शबाना आझमी म्हणाल्या, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये समाजात कमालीचा बदल झाला आहे. धर्म, जात हे विषय संवेदनशील झाले आहेत. त्यातून निर्माण होणारी विदारक परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. अशा वेळी कला हे सामाजिक बदल घडवणारे शस्त्र असते. स्त्री-पुरुष समानता आल्याशिवाय समाजाची प्रगती होऊच शकत नाही. स्त्री आणि पुरुष एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे आहेत, त्यांची स्वत:ची ओळख आहे. ही ओळख जपून समतोल साधला जायला हवा. पुरुष स्त्रीवादी असू शकत नाही किंवा स्त्री कणखर असू शकत नाही, हा समज मोडून काढायला हवा.’’‘स्टार’ होत असताना कलाकाराच्या आयुष्याला वेगळे वळण मिळत असते. खºया जगाशी, तेथील माणसांशी कलाकाराचासंपर्क तुटत जातो. संवादाचीदालने बंद होतात. अशा परिस्थितीत पुन्हा कलाच ही दालने खुलीकरते. विशिष्ट भूमिकेतीलकलाकार आणि प्रत्यक्ष आयुष्यातील कलाकार यांत खूप फरकअसतो, हे प्रेक्षकांनी समजूनघ्यायला हवे. मी आजवर मला आवडलेल्या आणि पटलेल्या भूमिकाच साकारत आले आहे’, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Javed Akhtarजावेद अख्तरPuneपुणेShabana ajhamiशबाना आझमी