पुणे- यंदा मुलुंड येथे १३ ते १५ जून या कालावधीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनावर कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी टीका केली आहे. मुलुंडमध्ये होऊ घातलेल्या नाट्य संमेलनाला खरंच ‘अखिल भारतीय’ म्हणायचे का? हा प्रश्न सुनील महाजन यांनी उपस्थित केला आहे.7 तासांचे संमेलन करणे फारसे कुणाला पसंत पडले नाही. रात्रभर होणा-या कार्यक्रमांना रसिक लाभतील का? नवीन कार्यकारिणी आली आहे निवडणुकांमुळे संमेलन घ्यावे लागले आहे. त्यामुळे हे संमेलन जरा घाईघाईमध्ये होत आहे. यातच हे रसिक आणि रंगकर्मी यांचे संमेलन आहे.या संमेलनाला राज्यभरातून रंगकर्मी आणि शाखांचे विविध प्रतिनिधी येतात, पण पावसामुळे येतील का? हा प्रश्न आहे. संमेलनापासून रसिक दुरावला जाऊ नये. संमेलनाच्या माध्यमातून नाट्यगृह, वाढलेले दर यावर चर्चा व्हायला पाहिजे. वर्षभराच्या नाट्यविषयक गोष्टींचा आढावा घेतला जावा ही अपेक्षा असते. पण कितपत गांभीर्याने विषय मांडले जातील त्याबददल साशंकता आहे.