शहरं
Join us  
Trending Stories
1
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
2
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
4
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
5
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
6
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
7
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
8
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
9
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
10
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
11
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरणार?; चर्चा रंगल्यानंतर अशोक चव्हाणांचा खुलासा
12
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
13
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
14
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
15
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
16
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीचा मुंबईतल्या जागांचा फॉर्म्युला ठरला; अजित पवार गटाला ३ जागा तर भाजपा, शिवसेनेला...
17
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा
18
जाहीर सभेत राहुल गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य, भाजप आमदारावर गुन्हा दाखल
19
Karva Chauth 2024: द्रौपदीनेही पांडवांसाठी केले होते करवा चौथ व्रत; वाचा व्रताचे महाभारत कनेक्शन!
20
डिसेंबरमध्येही कार-होम लोन स्वस्त होणार का? RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

विधानसभेला मतदान करायचंय ना! नाव नोंदणीसाठी उद्या शेवटची संधी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By नितीन चौधरी | Published: October 18, 2024 6:40 PM

शनिवार १९ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदवल्यास मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल

पुणे : राज्यात विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. त्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी आपले नाव प्राधान्याने मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना आज (दि.१९) शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांनी आजच मतदार यादीत आपले नाव नोंदवावे.

आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना शनिवारी रात्रीपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी. जेणेकरून मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल. नागरिकांना निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाइन ॲपद्वारे घरबसल्या मतदार यादीमध्ये नावनोंदणी करता येईल. यासाठी वयाचा आणि निवासाचा पुरावा आवश्यक आहे. ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे. मतदारांनी मतदार यादीमध्ये आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी. मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. ६ भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे शनिवारपर्यंत सादर करावा, असे आवाहनही डाॅ. दिवसे यांनी केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024commissionerआयुक्तVotingमतदानSocialसामाजिकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग