शहरं
Join us  
Trending Stories
1
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
2
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
3
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
4
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
5
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
6
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
7
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
10
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
11
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
12
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
13
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
14
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
15
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
16
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
17
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
18
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
19
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
20
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 

डॉक्टर मारहाण प्रकरण: नगरसेविका आरती कोंढरे यांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 4:01 AM

रुग्णालयामध्ये न जाण्याची घातली अट

पुणे : ससून रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेविका आरती कोंढरे यांना सत्र न्यायालयाने गुरुवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रुग्णालयामध्ये न जाण्याच्या अटीवर सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी हा जामीन मंजूर केला.कोंढरे यांनी मारहाण केल्याची फिर्याद रुग्णालयातील डॉ. स्नेहल अशोक खंडागळे (वय २६) यांनी दिली आहे. हा प्रकार दि. १३ मार्च रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात घडला. या वेळी डॉ. खंडागळे या एका रुग्णावर उपचार करीत होत्या. कोंढरे यांनी तिथे येऊन दुसऱ्या रुग्णाविषयी विचारणा केली. ‘या ठिकाणी कोण डॉक्टर आहेत, कोण पाहत आहे?’ अशी आरडाओरड केली. तसेच त्यांनी छायाचित्रे व व्हिडीओ शूटिंगही सुरू केले. खंडागळे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोंढरे यांनी आपल्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार खंडागळे यांनी केली आहे. याप्रकरणी कोंढरे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी कोंढरे यांनी न्यायालयात अर्ज केला. त्यावर गुरुवारी सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.नगरसेविका आरती कोंढरे यांचा निषेधलोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविका आरती कोंढरे यांनी डॉक्टरांना मारहाण करणे ही घृणास्पद गोष्ट आहे. अशा गोष्टींना योग्य वेळी डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा केला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी केली आहे. तसेच, भाजपाच्या नगरसेविका कोंढरे यांचा राष्ट्रीय डॉक्टर सेल यांच्यातर्फे आम्ही निषेध करीत आहोत आणि तातडीने डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात यावी. हे त्वरित झाले नाही, तर आम्ही डॉक्टरांच्या वतीने आंदोलन करणार आहोत, असा इशारा या वेळी राष्ट्रवादी डॉक्टर सेलने दिला.

टॅग्स :BJPभाजपा