पुणे : राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर चार दिवसांपासून बेमुदत सामूहिक रजेवर गेले आहेत. निवासी डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्याविरुद्ध पुणे जिल्ह्यातील ४० डॉक्टरांच्या संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘डॉक्टर्स सिक्युरिटी फेडरेशन’मार्फत पुणे जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स असोसिएशनच्या सभासदांना दवाखाने व खासगी रुग्णालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या ‘बंद’ला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेडरेशनमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस मेडिकल सेल, डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशन, पश्चिम विभाग पुणे डॉक्टर्स असोसिएशन, येरवडा डॉक्टर्स असोसिएशन, पुणे स्त्रीरोग डॉक्टरांची असोसिएशन, कर्वेनगर डॉक्टर्स असोसिएशन, कोंढवा डॉक्टर्स असोसिएशन, उत्तमनगर शिवने डॉक्टर्स असोसिएशन, आयुष डॉक्टर फेडरेशन, वडगाव शेरी चंदननगर खराडी डॉक्टर्स, हडपसर मेडिकल असोसिएशन, जनता वसाहत पर्वती डॉक्टर्स असोसिएशन, फिजिशिअन्स आॅफ पुणे असोसिएशन, इस्ट पुणे कन्सलटंट असोसिएशन, नर्सिंग होम व क्लिनिक ओनर्स पुणे असोसिएशन, नॅशनल मेडिकोस असोसिएशन, रेडिओलॉजी असोसिएशन, पुणे आॅर्थोपेडिक सोसायटी, पुणे सोसायटी आॅफ अॅनेस्थेटिस्ट, पुणे आॅफथेलमिक सोसायटी, इएनटी असोसिएशन, बाणेर मेडिकल असोसिएशन, मेडिकल कन्सलटंट असोसिएशन, कोथरूड डॉक्टर्स असोसिएशन, सांगवी पिंपळेगुरव डॉक्टर्स असोसिएशन, चेस्ट केअर असोसिएशन, बी. जे. पी. डॉक्टर्स सेल, वारजे डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल डॉक्टर्स संघटना, कोंढवा वानवडी डॉक्टर्स असोसिएशन या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय येथील निवासी डॉक्टरांना भेट दिली. डॉक्टरांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी पाठिंबा व सर्व प्रकारचे सहकार्य घोषित केले. (प्रतिनिधी)
डॉक्टर सिक्युरिटी फेडरेशनचा ‘बंद’ला पाठिंबा
By admin | Published: March 24, 2017 4:17 AM