पुणे : चुकीच्या औषधोपचारांमुळे प्राण गमवाव्या लागलेल्या युवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर खडकी पोलिसांनी ही कारवाई केली असून अद्याप या डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. डॉ. राजेश कुंडलिक औटी (रा. बोपोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संजय मधुकर जाधव (वय ४३, रा. बोपोडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून २०१२ रोजी जाधव यांची मुलगी प्रियंका (वय १६) हिला ताप आला होता. तिला औषधोपचारासाठी बोपोडीच्या औटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टर राजेश याने प्रियंकाला तपासल्यानंतर औषधे दिली. या औषधांमुळे तिला दमा व जुलाबाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे पुन्हा तिच्यावर राजेशने उपचार केले. तिची प्रकृती अधिकच गंभीर झाली. यात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तपासणीनंतर निर्णयराजेशने तिच्यावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केल्यानंतर उपचारांची कागदपत्रे ससून रुग्णालयातील समितीकडे पाठविण्यात आली होती. या समितीने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर राजेश दोषी असल्याचे निष्पन्न झाले. ससूनने तसा अहवाल पोलिसांना दिल्यावर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जिवे मारण्याचा प्रयत्नदेऊळगावराजे : काळेवाडी (ता. दौंड) येथील दादा गायकवाड यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्जेराव गायकवाड (वय ६७) व दुष्यंत गायकवाड (वय १९, दोघेही रा. काळेवाडी, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादावरून ३० एप्रिल २०१४ रोजी दादा गायकवाड यांना वरील आरोपींनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. (वार्ताहर)
डॉक्टरला अटक
By admin | Published: June 13, 2014 5:10 AM