पुणे : ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाने निवासी महिला डॉक्टराला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात रुग्णाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी २७ वर्षाच्या महिला निवासी डॉक्टरांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोेंढवा येथील एका ३३ वर्षाच्या रुग्णावरससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हा रुग्ण एचआयव्ही, न्युमोनिया अशा दुर्धरविकाराने ग्रस्त आहे. १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या रुग्णाने उपचारासाठी लावलेला कॅथेटर स्वत: काढला व तो फेकून देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रुग्णालयात असलेल्या या महिला डॉक्टरने त्यालासमजावून सांगण्याचा प्रयत्न केला. रुग्णाने डॉक्टर महिलेला धक्काबुक्की केली. त्यावेळी तेथे असलेल्या सफाई कर्मचार्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रुग्णाने सफाई कर्मचार्याला धक्काबुक्की केली.पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी रूग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना ....
मास्क न लावला फिरणार्यांची पोलिसांना धक्काबुक्की वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर तरुणाने मित्रांना बोलावून पोलिसांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये घडला असताना असाच प्रकार खडकीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मास्क न लावता विनाकारण दुचाकीवरुन फिरणार्यांना हटकले म्हणून मित्रांना बोलावून पोलिसांना शिवीगाळ करुन मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.कुमेर मोहम्मद तांबोळी (वय २३, रा. चेतक सोसायटी, बोपोडी) आणि शोएब बशीरमुजावर (वय २३, रा. महादेववाडी, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार अरबाज इक्बाल (रा. गाडी अड्डा, खडकी) आणि सैजाद मन्सूरीया दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शरद खैरनार यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार खडकी येथील इंदिरा कल्याण केंद्र कसाई मोहल्ला येथे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध भाग सील करण्यात आला आहे. तसेच शहरातील प्रत्येक व्यक्तीने मास्क तोंडाला लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी शरद खैरनार आपल्या सहकार्यांसह रविवारी रात्री साठे आठच्यासुमारास खडकी बाजार मार्शल म्हणून इंदिरा कल्याण केंद्र कसाई मोहल्ला येथे गस्तीवर होते. यावेळी कुमेर तांबोळी हा तोंडाला मास्क न लावता आदेशाचा भंग करून विनाकारण फिरत असताना दिसून आला. पोलिस कर्मचारीखैरनार यांनी त्याला याबाबतचे कारण विचारले असता आरोपीला राग आला.त्यानंतर आरोपीने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून संगनमत करत खैरनार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी कोंढावळे यांना देखील शिवीगाळ करून धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.