भिगवण : धुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी भिगवण येथील डॉक्टर मेडिकल असोसिएशन व पॅथॉलॉजी संघटनेकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मदनवाडी चौकातून सुरू झालेला मोर्चा पुणे-सोलापूर सेवारस्त्याने मार्गक्रमण होत भिगवण बाजारपेठेतून हायस्कूल रस्त्याने पोलीस ठाण्यापर्यंत आला. डॉक्टर, मेडिकल व्यावसायिक, तसेच वैद्यकीय व्यवसायास हातभार लावणाऱ्या सर्व संघटनांनी यात सहभाग नोंदवित आपले व्यवसाय बंद ठेवले. मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भारत भरणे यांनी निवेदनाचे वाचन केले. निवेदन भिगवणचे पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांना दिले. डॉ. एल. जी. शहा, डॉ. माधव नाईक-निंबाळकर, जयप्रकाश खरड, ज्ञानेश्वर रेनुकर, पद्मा खरड, पांडुरंग जिरगे, मिथुन यादव, अजय थोरात, युवराज गोडसे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
भिगवण येथे डॉक्टरांचा मोर्चा
By admin | Published: March 21, 2017 5:04 AM