सध्या कोरोना महामारीमुळे सामान्य माणूस होरपळत आहे. रुग्णसंख्या कमालीची वाढली असल्यामुळे हाॅस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, बेड मिळाले तर ऑक्सिजन मिळत नाही ऑक्सिजन मिळाले तर व्हेंटिलेटर, प्लाझ्मा, रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. त्यासाठी हजारो रुपये रुग्णांना मोजावे लागत आहे. तर दुसरीकडे अनेक मोठ्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करून घेण्याआधीच ॲडव्हान्स रक्कम म्हणून लाखो रुपयांची मागणी केली जाते. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक अक्षरश: हतबल होत आहेत अशा वातावरणात रुग्णांची व गावाची मदत करण्यासाठी डॉ. पाटील धावून आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी अहोरात्र प्रयत्न करत रुग्णांच्या उपचारासाठी स्वत:ला झोकून दिले असताना दुसरीकडे ग्रामपंचायतीला ॲंटिजन टेस्टचे किट दिल्याने गावात त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी डॉ. लता पाटील, सरपंच मीना दिवेकर, उपसरपंच प्रदीप दिवेकर, पोलीस पाटील किशोर दिवेकर, मारुती फरगडे, राहुल दिवेकर, विंदा दिवेकर, बापू खोमणे उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०८वरवंड डॉक्टर
ओळ- रॅपिड ॲंटिजन टेस्ट किट देताना डॉ. लता पाटील व सरपंच तसेच इतर सदस्य ग्रामस्थ