लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालय वगळता, शहरातील अन्य ११२ लसीकरण केंद्र ही लसीअभावी सध्या बिनकामाची ठरली आहे़ अमूक एक ठिकाणी लसीकरण केंद्र आहे, पण ते नावालाच अशी परिस्थिती सध्या शहरात आहे़ पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोस घेण्याची तारीखही उलटून गेली पण, लसच उपलब्ध नसल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे़
शहरात लस कधी येणार, आली तरी ती कोणत्या वयोगटासाठी मिळणार, दुसऱ्या डोससाठीचे काय नियोजन आदी प्रश्न सध्या आ वासून उभे आहेत़ अशा परिस्थितीत राज्य शासन केंद्राकडून लस आली की लागलीच महापालिकेला पुरविली जाईल, असे आश्वासन देण्यात येत आहे़ शहरात ३० एप्रिलला केवळ ५ हजार लसीचे डोस आले होते तेही, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी़ आता हे पाच हजार डोसही ७ मे पर्यंत वापरण्यात येणार आहे़ तर दुसरीकडे ४५ वर्षे वयोगटावरील लसीकरण व नागरिकांना दुसरा डोस कधी मिळणार याबाबत मात्र संभ्रह निर्माण झालेला आहे़
------------------------
‘न आलेल्या लसीचे नियोजन’
महापालिकेने १ मे पासून १८ ते ४४ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी तथा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल यासाठी नियोजन केले़ प्रत्येक प्रभागात दोन लसीकरण केंद्र, १२ हजार लोकसंख्येमागे एक केंद्र, तर युवा वर्गाला स्वतंत्र व्यवस्था करून लसीकरण करावे यासाठीही आखणी करण्यात आली़
परंतु, या ‘न आलेल्या लसीचे’ नियोजन आता पूर्णत: बारगळे असून, सध्या महापालिकेची स्थिती ‘आडात नाही तर पोहºयात कुठून येणार’अशी झाली आहे़ आहे त्याच लसीकरण केदं्राना लस उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असताना, ७ मे नंतर पुढे १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला लस कशी व कुठे द्यायची ही प्रश्न अनुत्तरीतच आहे़ सध्या केवळ दोन केंद्रांवर लसीकरण सुरू असून, येथेही तीन दिवसात केवळ अॅप नोंदणीच्या प्रकियेमुळे निम्मेच लसीकरण होऊ शकले आहे़
---------------------