--
लोणी काळभोर : पूर्व हवेलीत लोणी काळभोरसह उरुळी कांचन या लोकसंख्येने मोठ्या गावात कोरोनाबाधितांची संंख्या दिवसेेंदिवस वाढत आहे. रुग्ण जास्त व वैद्यकीय सुविधांचा कमतरता यामुळे बेड? उपलब्ध होत नाहीत. त्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी, राजकीय नेत्यांसह पत्रकारांच्या माध्यमातून प्रयत्न करूनही बेड? मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईकांची अवस्था अतिशय दयनीय झाली. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांवर बेड? देता का बेड? अशी याचना करण्याची वेळ आली आहे.
अतितीव्र, तीव्र व मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णसंख्येेेत वाढ होत असल्याने ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा वाढला आहे. एखाद्यास बेड मिळालाच तर रेमडेसिविर या इंजेक्शनसाठी नातेवाईकांना रात्री-अपरात्री थेट पुणे गाठावे लागत असल्याने पूर्व हवेलीत अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन, नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडवाव्यात, अशी मागणी पूर्व हवेलीतील नागरिक करत आहेत.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, थेऊर व उरुळी कांचन या ५ ग्रामपंचायत हद्दीत गेले ४ दिवसांत रुग्णांसंख्येेत लक्षणीय वाढ होत आहे. शासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही नागरिक मात्र कोरोनाचा व आपला काय संबंध? अशा अविर्भावात फिरताना दिसत आहेत. पोलीस आले की मास्क लावण्याचे नाटक करतात. ते गेले की मास्क काढून नागरिक दिवसभर फिरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळेच पूर्व हवेलीत कोरोनाग्रस्तांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. पोलीस, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी वारंवार नागरिकांना सूचना देताना दिसतात परंतु नागरिक त्यांना केराची टोपली दाखवत आहेत.
पूर्व हवेलीमधील अत्यवस्थ रुग्णांची संख्या हजारोंच्या घरांत पोहोचली असून, यातील ४० टक्क्यापेक्षा जास्त रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. यातुलनेत लक्षणविरहीत किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या, घरी विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली तरी ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे लागते, त्यामुळे रुग्णालयातील बेड कमी पडत आहेत. बाधितांना उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाही. रुग्णांकडे उपचार करण्यासाठी आवश्यक पैसेही उपलब्ध आहेत. मात्र उपचार घेण्यासाठी बेड मिळत नसल्याची खंत नातेवाईक व्यक्त करीत आहेत.
--
पूर्व हवेलीत गेले काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पुढील २४ तासांच्या आत वाघोली ३००, नऱ्हे ३०० व लोणी काळभोर येथे २०० बेड अशी ३ कोरोना सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे पूर्व हवेलीत पुढील २४ तासांत ५०० पेक्षा जास्त बेड उपलब्ध होणार आहेत. यापुढील काळात गरजेनुसार लोणी काळभोर येथे आणखी २०० बेड वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.
विजयकुमार चोबे (अतिरिक्त तहसीलदार हवेली)