शरद पोंक्षेंना देश दहशतवादाकडे न्यायचा आहे का? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:14 AM2022-07-26T10:14:18+5:302022-07-26T10:17:53+5:30

राहुल गांधींवरील टिकेला प्रत्युत्तर...

Does Sharad Pokshana want to take the country to terrorism? | शरद पोंक्षेंना देश दहशतवादाकडे न्यायचा आहे का? काँग्रेसचा सवाल

शरद पोंक्षेंना देश दहशतवादाकडे न्यायचा आहे का? काँग्रेसचा सवाल

Next

पुणे : शाळेतील मुलांसमोर आपण काय बोलतो आहोत याचे साधे भानही नसणाऱ्या अभिनेते शरद पोंक्षे यांना देशाला दहशतवादाकडे न्यायचे आहे का, असा प्रश्न काँग्रेसने सोमवारी केला. पोंक्षे ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात त्या विचारधारेच्या लोकांनीच सावरकरांना एकेकाळी कसे वागवले याचा अभ्यास करावा, असा सल्लाही देण्यात आला.

दरम्यान, पोंक्षे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सावरकरांच्या विचारांची दहशत वाटायला हवी, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर पुण्यातील लहान मुलेही सावरकरांचे नाव नीट घेतात, दिल्लीतील एका ५२ वर्ष वयाच्या मुलाला मात्र त्यांचे नाव नीट घेता येत नाही अशी टीका नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर केली होती.

प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, पोंक्षे अभिनेते आहेत, शाळेतील मुलांसमोर काय बोलावे हे त्यांना कळत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ यांनी सावरकरांना कधीही सन्मान दिला नाही. कायम त्यांच्या विरोधात राहिले. काँग्रेसचे व सावरकरांचे राजकीय मतभेद होते, मात्र स्वातंत्र्यसैनिक म्हणून काँग्रेसने त्यांचा नेहमीच सन्मान केला. मुंबईतील सावरकर स्मारकाला काँग्रेसनेच निधी दिला. इंदिरा गांधी यांनी तर सावरकरांवर टपाल तिकीट काढले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, अभिनेता पोंक्षे यांच्या विधानाचा काँग्रेस निषेध करत आहे. राहुल गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य त्यांनी त्वरित मागे घ्यावे ; अन्यथा काँग्रेसलाही त्यांना तसेच उत्तर देता येते, असा इशाराही त्यांनी दिला. सचिन आडेकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी माजी नगरसेवक अजित दरेकर व अन्य काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Does Sharad Pokshana want to take the country to terrorism?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.