तांभाड : येथे सातपैकी सहा जागा बिनविरोध होऊन तेथे सचिन रामदास सोंडकर, अमोल बंडू शिळीमकर, संगीता संतोष सोंडकर, पूजा गणेश सोंडकर, सविता नेताजी शिळीमकर व कल्याणी शिवाजी पवार यांची बिनविरोध निवड केली तर उर्वरित एका सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच सचिन नारायण जांभळे हे विजयी झाले.
हातवे खुर्द : येथील ग्रामपंचायत निवडणकीत गावातील ज्येष्ठांनी बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार चार जागा बिनविरोध झाल्या तर तीन जागांची अटीतटीची निवडणूक एकाच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये झाली. या ठिकाणी सुरेखा अनिल खुटवड व रखमा शंकर रसाळ, जनार्दन दत्तात्रेय खुटवड, नवनाथ सुभाष खुटवड यांची बिनविरोध निवड झाली तर इतर तीन प्रभागात विकास उत्तम खुटवड, पुष्पा अरविंद खुटवड, दीपाली राहुल खुटवड विजयी झाले.
हातवे बुद्रुक : राष्ट्रवादीच्या दोन जागा सुवर्णा राजेंद्र पालखे व प्रशांत शिवाजी सणस बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर निवडणुकीत राष्ट्रवादीचे अंकिता दीपक नाक्ती, संदेश संभाजी खराडे, नीलेश दिलीप थिटे, दुर्गाबाई सोपान जामदार असे सहा जण निवडून आल्याने हातवे बुद्रुकवर विक्रम खुटवड यांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले. येथील एका प्रभागात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजांच्या एकत्रित गटाचे मोहन महादेव पवार, शुभांगी गणेश भिलारे, वंदना अनिल थिटे हे विजयी झाले आहेत.
मोहरी खुर्द : येथील ग्रामपंचायतीत विक्रम खुटवड यांच्या विचारांना मानणारे सात सदस्य विजयी झाले आहेत. यामध्ये मनीषा सागर पांगारकर, शिल्पा सतीश पांगारकर, सतीश संपत पांगारकर, वर्षा सुरेश पांगारकर, ज्ञानेश्वर श्यामराव चव्हाण हे पाच सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत तर नंदा प्रकाश पांगारकर व सागर सहदेव पांगारकर यांनी दोन जागेसाठी लढत देत काँग्रेसच्या उमेदवारांवर विजय मिळवला आहे. या शिवाय मोहरी बुद्रुक येथे देखल राष्ट्रवादीचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.
हातवे पंचक्रोशीत राष्ट्रवादीचा कोणताही गट तट नसून, संपूर्ण भाग स्व. काशिनाथराव खुटवड यांना मानणारा आहे. या भागात राष्ट्रवादीच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने अनेक विकासकामे झाली आहेत. या पुढील काळात सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहे.
विक्रम खुटवड, सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती
२२ नसरापूर .
विजयी उमेदवारांसमवेत विक्रम खुटवड.