शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

डोंगरी ते सागरी किल्ले घरोघरी साकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 2:23 AM

दिवाळीची पुण्यातील ओळख म्हणजे गल्लीबोळांमधील घराघरांसमोर साकारणारे दगडमातीचे किल्ले! मुलांच्या या छंदाचे रूपांतर आता मोठ्यांच्याही आवडीत झाले असून, त्यामुळेच सोसायट्यांमध्ये समूहाने आता खऱ्याख-या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारू लागल्या आहेत.

पुणे - दिवाळीची पुण्यातील ओळख म्हणजे गल्लीबोळांमधील घराघरांसमोर साकारणारे दगडमातीचे किल्ले! मुलांच्या या छंदाचे रूपांतर आता मोठ्यांच्याही आवडीत झाले असून, त्यामुळेच सोसायट्यांमध्ये समूहाने आता खऱ्याख-या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारू लागल्या आहेत. त्यात डोंगरी किल्ल्यांपासून ते सागरी किल्ल्यांपर्यंत बºयाच किल्ल्यांचा समावेश आहे.माती दगड आणायचे व ते एकमेकांवर रचून त्यावर तरटाचे ओले पोते टाकायचे, चिखलाचे लिंपण केले की झाला किल्ला तयार अशी वर्षानुवर्षांची परंपरा. त्यातूनच किल्ल्यावर जाण्याची आवड निर्माण झाली. गिर्यारोहकांचे ग्रुप स्थापन होऊ लागले. त्यांच्याकडूनच आता शहरातील विविध सोसायट्यांमध्ये किल्ले साकारण्यात येतात. या किल्ल्यांना आता गणेशोत्सवांमधील देखाव्यांचे स्वरूप येऊ लागले आहे. सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रांचा वापर करत किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती यात साकारण्यात येते.सनसिटी रस्त्यावरील शिवसागर सिटीत सह्याद्री ट्रेकर्स यांनी किल्ले जंजिरा साकारला आहे. सोसायटीमध्येच राहणाºया मुलांचा हा ग्रुप आहे. पाण्याचा हौद तयार करून त्यात जंजिरा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. अभिनेता अंकुश चौधरी याच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. महेंद्र पासलकर, महेंद्र दंडवते, दिनकर देशमुख, विजय भांबरे, सचिन शिरसाट, श्रीकृष्ण कानिटकर व उत्सव समिती प्रमुख मनोज बिडकर, आशिष खळदकर यांनी यासाठी काम केले. सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बोधे, उपाध्यक्ष संजय साळुंके, सचिव सुवर्णा वहाडणे यावेळी उपस्थित होते.शुक्रवार पेठेत खडक पोलीस ठाण्यासमोर अंबिका माता भजनी मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीत किल्ला तयार करत आहे. यंदा त्यांनी किल्ले रामसेजची प्रतिकृती केली आहे. लाईट अ‍ॅँड साऊंड शो असलेली ही प्रतिकृती १५ फूट गुणिले २० फूट अशा आकारात आहे. १५ मिनिटांचा शो सादर करण्यात येतो. औरंगजेब महाराष्ट्रात आल्यावर त्याने सर्वप्रथम या किल्ल्यावर स्वारी केली व तब्बल साडेपाच वर्षे किल्लेदाराने हा किल्ला झुंजवत ठेवला होता. हा सगळा इतिहास जिवंत करून सांगण्यात येतो. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष श्री. म. भावे यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. श्रीकृष्ण पाटील, दिलीप गिरमकर, राम तोरकडी या वेळी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष अमित कोळंबेकर, प्रसाद कोळंबेकर, सौरभ घुमटकर, आदित्य काबदुले, सौरभ दहिफळे, अनंत वाडेकर यांनी परिश्रम घेतले.याशिवाय शहरात अनेक ठिकाणी किल्ले साकारण्यात आले आहेत. फडगेटजवळच्या सेवा मित्र मंडळाने नाशिकचा हरीहर ऊर्फ हर्षगड साकारला आहे.माणिकबाग येथील साईदत्त सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शिरवळ येथील सुभानमंगळ गडाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. गरवारे महाविद्यालयासमोरच्या रस्त्यावरील संजीवनी हॉस्पिटलजवळ दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने पन्हाळा किल्ला तयार करण्यात आला आहे.महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज उद्यानात दरवर्षी किल्ला तयार करा स्पर्धा घेण्यात येते. त्यात असंख्य मुले-मुली सहभागी होत असतात. याही वर्षी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व किल्ले प्रदर्शनासाठी म्हणून खुले करण्यात आले आहेत. गल्लीबोळांमध्ये व पेठांमधल्या वाड्यांमधील किल्लेही आता आधुनिक झाले आहेत. तिथेही तंत्रज्ञानाचा वापर कल्पकतेने करून किल्ले तयार करण्यात येतात.या किल्ल्याच्या जोडीने त्यावर मांडण्यात येणाºया चित्रांची बाजारपेठही चांगली फुलली आहे. सिंहासनाधीश्वर शिवाजी महाराजांपासून ते मावळ्यांपर्यंत व गवळणीपासून ते हातगाडीविक्रेत्यापर्यंत तसेच वाघसिंह अशा वन्यप्राण्यांचीही अनेकविध चित्रे या बाजारात आहे. कुंभारगल्ली, तुळशीबाग या मोठ्या ठिकाणांबरोबरच काही पेठांमध्ये लहानलहान स्टॉल्सवरही चित्रे विकत मिळतात. गेली काही वर्षे तर तयार किल्लेही या बाजारपेठेत मिळू लागले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र