ल़ोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: स्वत:च डॉक्टर बनून कोरोनाबाधित झालेल्या रुग्णाच्या चाचण्या करू नका. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. काही चाचण्या आवश्यक असतातच. त्यासाठी राज्य सरकारच्या कोरोना टास्क फोर्सने मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. त्याची माहिती नातेवाईकांनी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यासाठीही कोरोना टास्क फोर्स आहे. त्यांनीही कोरोना रूग्णांवरील ऊपचारांबाबत अनेक मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. त्याचा अवलंब केला जातो असे उपचार करणार्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
* प्रत्येक कोरोना रूग्णाला सिटी स्कॅन तपासणी आवश्यक नसते. आधी एक्सरे व त्यात काही गंभीर आढळले तर सिटी स्कॅन करावे
* कोरोना रूग्णाचे वय, त्याच्या आजाराचे निदान करताना जाणवलेली लक्षणांची तीव्रता यावर कोणत्या तपासण्या कराव्यात, करू नयेत हे ठरवता येते, मात्र त्याचा निर्णय डॉक्टरांनी घ्यायचा असतो.
* कोरोना आजारात रूग्णाच्या रक्ताच्या, छातीच्या व अशाच वेगवेगळ्या तपासण्या सातत्याने कराव्या लागतात ही वस्तुस्थिती आहे. रूग्णाची स्थिती, डॉक्टरांचे ऊपचार यावरच ते अवलंबून असते. त्यातल्या या गरजेच्या, या गरज नसलेल्या असे ठरवणे योग्य नाही.
* होम आयसोलेशन, रुग्णालय, आयसीयू यासाठी वेगवेगळ्या चाचण्याआवश्यकच असतात.
* आधीच्या काही व्याधी असतील तर त्याची तीव्रता समजून घेऊन ऊपचार करावे लागतात. ती तीव्रता समजण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. रक्तदाब असेल तर स्टेरॉइडचा डोस किती द्यायचा हे तपासणीनंतरच कळते
* अतिदक्षता विभागात रूग्णाला दाखल करण्यात येते कारण त्याची प्रक्रुती नाजूक झालेली असते. अशा वेळीही काही तपासण्या करणे गरजेचे असते.
डॉ. सुभाल दीक्षित
माजी अध्यक्ष- इंडियन सोसायटी क्रिटिकल केअर मेडिसिन. संचालक- संजीवन हॉस्पिटल अतिदक्षता विभाग.
----//
* कोरोना रूग्णांमध्ये सिटी स्कँन व अन्य तपासण्यांमध्येच किती संसर्ग झालाय ते स्पष्ट समजते. त्यावरून ऊपचारांची दिशा ठरवली जाते.
* रूग्ण दाखल झाल्यानंतर पहिल्या दिवशी ब्लड, युरीन, अशा सर्व प्रकारच्या तपासण्या आवश्यकच असतात. रूग्णांची प्राथमिक माहिती त्यातून मिळते व उपचार करणे सुलभ होते.
* त्यानंतर रूग्णाच्या प्रक्रुतीमध्ये एखाद्या गोष्टीत एकदम लक्षणीय बदल झाला तर फक्त त्याच गोष्टीची तपासणी त्वरीत करणे गरजेचेच असते.
* ऊपचार सुरू झाल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मिळतो याचे तपासणीविना निदान करता येते. मात्र त्याची खात्री करून घ्यायची गरज डॉक्टरांना वाटली तर तपासणी करण्याविषयी ते सांगतात.
* रूग्ण दाखल झाल्यानंतर साधारणपणे पाचव्या दिवशी पुन्हा तपासण्या करायला सांगतात ते ऊपचार तेच ठेवायचे की त्यात बदल करायचा हे ठरवण्यासाठी
* कोणत्या तपासण्या आवश्यक व कोणत्या अनावश्यक हा वादाचा विषय आहे. त्या खर्चिक आहेत.हे खरेही आहे, पण यात डॉक्टरांना काय वाटते हे महत्वाचे आहे.
* राज्य तसेच जिल्ह्यासाठी सरकारने कोरोना टास्क फोर्सने पहिल्या व नंतर ३, ५ , ७ दिवसांनी ऊपचाराची दिशा ठरवण्यासाठी आवश्यक तपासण्या कराव्यात असे म्हटले आहे. याची माहिती रूग्ण, त्याच्या नातेवाईकांनी ठेवावी.
* कोरोनाचे संकट सगळ्या जगासमोर आहे. वैद्यकीय क्षेत्रही त्याला धैर्याने सामोरे जात आहे. अशा वेळी संयम ठेवणे गरजेचे असते. काय वाटते ते डॉक्टरांबरोबर स्पष्ट बोलून यावर मार्ग काढता येतो.
डॉ. कपिल झिरपे
अतिदक्षता कक्ष विभागप्रमुख
रूबी हॉल क्लिनिक.
सदस्य- कोरोना सिटी टास्क फोर्स
-----///