शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राजकारणात यायच्या अजिबात भानगडीत पडू नका; अजित पवारांचा विद्यार्थ्यांना 'कानमंत्र' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:50 PM

जनतेचा पाठिंबा असेपर्यंत आम्ही इथे खुर्चीवर बसणार..पण ज्यादिवशी जनता पाठिंबा काढेल त्यादिवशी आम्ही घरी बसलो म्हणून समजा.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जसे रोखठोक वक्तव्य व शिस्तप्रिय स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तसेच ते प्रशासकीय यंत्रणेवर वचक ठेवण्यात हातखंडा असलेले मंत्री म्हणून देखील परिचित आहे.पण त्यांची एक आगळी वेगळी ओळख म्हणजे राजकीय सभांमधील भाषणे किंवा प्रशासकीय बैठका यांच्यात ते जुने किस्से ग्रामीण शैलीत रंगवून सांगतात तेव्हा उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकल्याशिवाय राहत नाही. आज देखील पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी तरुणांना ''राजकारणात यायच्या भानगडीत पडू नका,आता मी आलोय, इथेच अडकून पडलोय असा अजब गजब कानमंत्र देताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हास्याचे कारंजे फुटले. 

पुणेजिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधत यशस्वी जीवनाचा 'कानमंत्र' ही दिला. पवार म्हणाले, चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा. विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात. कोणत्याही क्षेत्रात जा, पण आई वडिलांचे,कुटुंबाचे, गावाचे नाव उज्ज्वल करा. 

पवार पुढे म्हणाले, रणजित डिसले या शिक्षकाची दखल संपूर्ण जगाने घेतली. आणि ते जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.त्यामुळे जिथे जाल तिथे उत्तम काम करा. आपल्या शहराचे, परिसराचे नाव उज्वल करा. तसेच जनतेचा पाठिंबा असेपर्यंत आम्ही इथे खुर्चीवर बसणार ज्या दिवशी जनता पाठिंबा काढेल त्याच दिवशी आम्ही घरी बसलो म्हणून समजा. पण प्रशासकीय अधिकारी(zp च्या CEO यांना उद्देशून) पदावर रुजू झाल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कालावधी वाया गेला, मात्र ऑनलाईनमुळे आपण ते नुकसान काही प्रमाणात भरून काढले आहे. त्याचप्रमाणे अद्यापही कोरोना अजून संपलेला नाही प्रत्येकाने मास्क घातला पाहिजे.आता बोलत असताना माझे उच्चर तुम्हाला कळावे म्हणून मी मास्क काढलाय नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्हीच मास्क नाही घातला आम्हाला काय सांगता?

आमच्यातील पुढारी बघा पोटं वाढलेले आहेत, सगळ्यांनी फिट रहायला हवे, व्यायाम करा, योगा करा, जे जे शरीरासाठी चांगले आहे ते ते करा, असाही सल्ला पवार यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारSchoolशाळाzpजिल्हा परिषदRanjitsinh Disaleरणजितसिंह डिसलेPoliticsराजकारण