धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या नादाला लागू नका; अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 04:18 PM2022-04-17T16:18:55+5:302022-04-17T16:31:23+5:30

राजकिय इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू

Dont follow the rhetoric of those who divide religion caste said ajit pawar without mentioning name raj thackeray | धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या नादाला लागू नका; अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला

धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांच्या नादाला लागू नका; अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला

Next

बारामती : सध्या राज्यात व देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला. कोऱ्हाळे  (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.

पवार म्हणाले, धर्म, जातीमध्ये तेड करणाऱ्यांच्या राजकिय इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू आहे, त्याला कदापी यश येता कामा नये. जातीय तणाव निर्माण झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा खरा फटका गरिबाला बसतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मोठ्या लोकांना याचा फटका बसत नाही. तो घरात बसतो.  मात्र दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चुल पेटते, अशा लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो.   

बाहेरच्या राज्यांकडून देखील वीज खरेदीचा निर्णय झाला आहे

 जो वीज बिल नियमीतपणे भरतो त्याला फटका बसणार नाही. जे वीज बिल भरत नाहीत त्यांचा भार वीज बील भरणाºयांवर बसतो. अलिकडे वीजेची चणचण भासायला लागली आहे. देशात व राज्यात देखील कोळशाची कमतरता आहे. त्यासाठी आम्ही परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतू आपल्या पॉवर प्लांटमध्ये १०० टक्के परदेशी कोळसा चालत नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे वीजेची मागणी ३ ते ४ हजार मेगावॅटने वाढली आहे. बाहेरच्या राज्यांकडून देखील वीज खरेदीचा निर्णय झाला आहे. कोयना प्रकल्पातून वीजेसाठी पाणी देण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मदत केली आहे. शेतकºयांसाठी पाणी शिल्लक ठेऊन उर्वरित पाण्याचे नियोजन वीजनिर्मितीसाठी केले असल्याचे पवार म्हणाले आहेत.  

Web Title: Dont follow the rhetoric of those who divide religion caste said ajit pawar without mentioning name raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.