पुणे: चिंचवड पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीची चर्चा राज्यभर सुरु आहे. या विधानसभेला नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. राहुल कलाटे यांना उमेदवारी न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. पक्षश्रेष्ठींनी मनधरणी करूनही कलाटे यांनी माघार घेतली नाही. अखेर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावरूनच अजित पवारांनी कलाटे यांना टोला लगावला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरला आहे, पण इथं आघाडीचाच उमेदवार जिंकून येणार. ती मत शिवसैनिकांची आहेत हे विसरु नका असं ते म्हणाले आहेत. चिंचवडमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी ते गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पवार म्हणाले, महाविकास आघाडीतून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र 'त्यांनी' अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरला आहे, पण इथे महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून येणार आहे. ती मत खरतर शिवसैनिकांची आहेत हे विसरु नका. तसेच आता कोणीही रुसु नका फुगु नका, अशीविनंती त्यांनी यावली पदाधिकाऱ्यांना केली आहे. ज्यांनी बंड केला त्यांचा शिवसेना तयार करण्यात खारीचाही वाटा नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
चिंचवड विधानसभा निकाल
२००९ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप - अपक्ष - ७८ हजार ७४१२) श्रीरंग बारणे - शिवसेना - ७२ हजार १६६३) भाऊसाहेब भोईर - कॉंग्रेस - २४ हजार ६८४
२०१४ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप - भाजप - १ लाख २३ हजार२) राहुल कलाटे - शिवसेना - ६३ हजार ४८९३) नाना काटे - राष्ट्रवादी - ४२ हजार ५५३
२०१९ची निवडणूक
१) लक्ष्मण जगताप - भाजप - १ लाख ५० हजार२) राहुल कलाटे - अपक्ष - १ लाख १२ हजार