आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर व आहुपे खोऱ्यातील पाच गावे अति धोकादायक गावे म्हणून घोषित आहेत. त्यामध्ये भीमाशंकर खोऱ्यामध्ये काळवाडी हे गाव आहे. कित्येक वर्षे मृत्यूच्या छायेत हे गाव वसले आहे. गावच्या वरच्या बाजूला असलेल्या भव्य अशा डोंगरावर सुटलेल्या अवस्थेत मोठमोठाले दगड आहेत. या दगडांना थोडा जरी धक्का लागला तरी संपूर्ण गावावर हे दगड कोसळू शकतात. याच काळवाडीच्या खालच्या बाजूला डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी व काही वर्षांपूर्वी धरण पूर्ण भरल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे गावाच्या खालच्या बाजूला मोठा आवाज होऊन मोठी भेग पडली आहे. यामुळे डोंगर कोसळण्याच्या दहशतीत काळवाडी येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. काळवाडी नंबर एक व नंबर दोन त्याचप्रमाणे शेळकेवस्ती असे मिळून ७० ते ८० घर असणारे हे गाव आहे. पाच सहा दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. याच गावातील घराघरांमध्ये पाण्याचा उपळा येऊन उबड निघाले आहेत. तर या डोंगरावर असणारे सुटलेले दगड खाली येत आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगराचे पाणी झिरपून या गावातील घरांच्या भिंतींना ओल येऊन काही घरे कोसळायचे ही प्रकार घडले आहेत. शासन दरबारी कित्येक वर्षे या गावाच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव प्रलंबित आहे. माळीनसारखी घटना घडल्यावर प्रशासन जागे होणार का ? असा प्रश्नही काळवाडी ग्रामस्थांना पडला आहे.
कोट
बा आम्ही वरच्या दगडाक पाहतोय अन् दगड आमच्याक पाहतोय. कधी आमच्यावर हे दगड घाला घालतील हे सांगता येत नाही. रातरात डोळ्याला डोळा न्हाय. घरामध्ये असलेल्या पेटत्या चुली मधुन पाण्याच उभड निघालत माळीन सारखा कव्हा घाला होईल सांगता येत न्हाय. सरकारी अधिकारी येतात; अन् म्हणतात तुम्ही सांजच्या पहारी वरती माचिचावाडीला झोपायला जा. अन सकाळ झाली का परत तुमच्या घरी परत जा. कित्येक वर्षी झाली आम्हा आशेला लावून सांगतात तुमच पुनर्वसन करू. मायबापांनो आमचं माळीन होऊन देऊ नका.
चिमा पारधी, दुंदा भोकटे, काळवाडी येथील ग्रामस्थ
चौकट
या काळवाडीच्या पुनवर्सनाचा विषय कित्येक दिवस शासन दरबारी पडुन आहे. पावसाळा सुरु झाला की प्रशासन व अधिकाऱ्यांना जाग येते. शासनाने तात्काळ या गावांचे पुर्नवसन करावे. या गावावरील डोंगरालाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. घरांना मोठ्या प्रमाणात ओलावा येवुन घरांमध्ये पाण्याचे बुडबुडे निघत आहेत. एखादी घटना घडण्यापुर्वी सरकारणे या बाबतची काळजी घ्यावी.
- विठ्ठल पारधी
सामाजिक कार्यकर्ते काळवाडी
फोटो ई मेल करत आहे.
फोटो खालचा मजकुर:-:-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशं
कर खोऱ्यामध्ये मृत्युच्या छायेत वसलेले काळवाडी हे गाव.
(छायाचिञ संतोष जाधव)
तळेघर वार्ताहार संतोष जाधव