पुणे : हाॅटेल तसेच केटरिंग व्यावसायिकांनी जर त्यांच्या वेटर्सला मावळ्यांचा ड्रेस काेड दिल्यास त्या हाॅटेल व केटरिंग व्यावसायिकांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विराेधात संभाजी ब्रिगेड स्टाईल अांदाेलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून देण्यात अाला अाहे. लग्नसराईत, साेहळ्यांमध्ये हाॅटेल, केटरिंग तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनचे लाेक त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांच्या पाेशाखात म्हणजेत एेतिहासिक पगडी, भाला व इतर पाेशाख घालून वेटरचे काम करावयास लावत अाहेत. हा त्या मावळ्यांचा अपमान अाहे. आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे 'मावळे' ही मराठी मनाची अस्मिता असून मावळे हे महाराष्ट्राचा अभिमान आहे.ज्यांनी स्वराज्य निर्माण करणेकामी आपल्या प्राणाची आहुती दिली. हा अवमान महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता कदापी सहन करणार नाही. त्यामुळे मावळा जर वेटर म्हणून दिसला तर जिथे दिसेल तिथे ठाेकण्यात येईल असे संभाजी ब्रिगेड करुन सांगण्यात अाले अाहे. तसेच संभाजी ब्रिगेडतर्फे हाॅटेल व्यवसायिकांना अावाहन करण्यात अाले अाहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांचा पाेशाख देऊन वेटरचे काम करण्यास लावू नये. अन्यथा सदरच्या केटरिंग तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या कर्मचाऱ्यांवर ब्रिगेड स्टाईलने कारवाई करण्यात येईल. तसेच हाेणाऱ्या अार्थिक नुकसानीस शिवप्रेमी जबाबदार राहणार नाहीत. त्याचबराेबर ज्यांच्याकडे लग्नसोहळा आहे अशांनी या अवमान करणाऱ्या लोकांना अाॅर्डर्स देऊ नये अन्यथा लग्नसोहळ्यात विघ्न निर्माण झाल्यास शिवप्रेमी जबाबदार रहाणार नाही असेही ब्रिगेडकडून सांगण्यात अाले अाहे.
मावळ्यांना वेटर केले तर, खळखट्याक : संभाजी ब्रिगेडचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:46 PM