पुणे : ‘जेएच१’ चा नवा व्हेरिएंटचा एकच पेशंट महाराष्ट्रात आढळला आहे. त्याची लक्षणे आक्रमक नसून साैम्य आहेत. त्या रुग्णाला संसर्ग झाला तेव्हा लक्षणे काय हाेती. पिक कसा हाेता आणि शेवट कसा हाेता याचा ग्राफिकल डाटा साेमवारपर्यंत गाेळा केला जाईल. त्याचे काेविड टास्क फाेर्सचे अॲनालिसिस केले जाईल आणि त त्यानुसार उपचाराची दिशा ठरवली जाईल, अशी माहीती आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग येथे जेएच१ या काेराेनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण सापडला असून त्याबाबत राज्याकडून काय तयारी सूरू आहे याबाबत आराेग्यमंत्री सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की राज्यातील सर्व आराेग्य संस्थांचे माॅक ड्रिल केले असून डाॅक्टर, रुग्णालये, ऑक्सिजन बेड यांची पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आराेग्य अधिकारी यांनी दरराेज सकाळी तासभर तालुका आराेग्य अधिका-यांसाेबत बाेलून माहीती घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. सिंधुदूर्गातील पहिला रुग्ण हा स्थानिक हाेता. ताे केरळला गेला असावा व त्यातून लागण झालेली असावी. नव्या व्हेरिएंटचे काॅंटॅक्ट ट्रेसिंग करत आहाेत.
व्हेरिएंटबाबत माहीती देताना सावंत म्हणाले की, हा जीवावर उठणारा व्हेरिएंट नाही. जेएन १ हा स्ट्राॅंग किंवा घातक नाही. हा साैम्य आहे. जे पेशंट मिळालेले आहेत त्यांची सर्व माहीती घेतली जात आहे. जेएचवन हा फास्ट पसरत असला तरी साैम्य असून घाबरून जाण्याची गरज नाही. सध्या ख्रिसमस, थर्टी फस्ट यानिमित्त काही काळजी घ्यावी. मास्क सक्तीचा नाही पण कुटूंबियांसाठी मास्क वापरा. तसेच गर्दीपासून दुर रहावे.
खासगी हाॅस्पिटल्स शासन व त्यांच्यामध्ये नाेडल ऑफिसर ठेवला आहे. त्यांच्याकडे किती रुग्ण ॲडमिट झाले याची माहीती समजेल. त्यासाठी घाबरून जाण्याचे कारण नाही. याच्या टेस्टिंग वाढवत आहे. माॅक ड्रिल करत आहाेत. येत्या दाेन ते तीन दिवसांत एक टास्क फाेर्स नेमला जाईल. त्याच्याकडून मार्गदर्शन मिळेल.