शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

काळजी करू नका, घाबरू नका, आम्ही ठणठणीत! कोरोनाग्रस्त रुग्णांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 1:33 PM

सुरुवातीचे दोन दिवस सगळेच घाबरलेले..

ठळक मुद्दे‘लोकमत’शी दूरध्वनीवरून साधला संवाद औषधोपचार सुरू झाल्यावर आता तब्येत होत आहे पूर्ववत

प्रज्ञा केळकर-सिंग- पुणे : ‘कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आम्हाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सुरुवातीचे दोन दिवस सगळेच घाबरलेले होते. कारण, अशा वेळी काय करावे, याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र, रुग्णालयातील यंत्रणा तातडीने कार्यरत झाली. औषधोपचार सुरू झाल्यावर आता तब्येत पूर्ववत होत आहे. गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये मला साधा खोकला, शिंकही आलेली नाही. दिवसभर आम्ही नामस्मरण, भजन करतो, आवडीची गाणी ऐकतो. आम्ही बरे होत आहोत’, हे बोल आहेत नायडू रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांचे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आणि घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी ‘लोकमत’शी दूरध्वनीवरून बोलताना केले.‘परदेशात प्रवास करून आल्यानंतर दोन-तीन दिवस ताप येत असल्याने मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासणी करायला सांगितले आणि अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाइकांशी फोनवर बोलणे सुरू होते. मोबाइल जवळ असल्यामुळे बातम्याही कळत होत्या. कोरोना विषाणूचा संसर्ग झाला की रुग्णांना खूप त्रास होतो, अशी माहिती अनेकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पोहोचत आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्याकडून व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. दररोज रक्तदाब, तापमान तपासले जाते. सर्वजण ठरावीक अंतरावरून आमची तपासणी करत आहेत. आम्हाला मदतीसाठी काही संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. टेन्शन घ्यायचे नाही, पथ्य पाळायचे आणि सकारात्मक विचार करायचा, ही त्रिसूत्री या अडचणीतून बाहेर पडण्याचे बळ देत आहे’, अशा भावना त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या............परदेशात गेल्यावर आम्ही अनेक ठिकाणी फिरलो, त्यामुळे संसर्ग नेमका कुठून झाला, हे सांगता येणार नाही. मात्र, सध्या प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, शासनाने दिलेले सर्व आदेश पाळावेत. विशेषत:, लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असे मला सांगावेसे वाटते. अशा काळात मोठ्या प्रमाणात अफवा पसरतात. त्यावरही आपण विश्वास ठेवू नये. स्वत:ची आणि आपल्या लोकांची काळजी घ्यावी, हाच सध्याचा सर्वोत्तम उपाय आहे.- नायडू रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्ण

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल