शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही! चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 9:42 PM

राज्यातील ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात अमित शहा यांना आज पत्र लिहणार आहे...

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईनंतर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असून त्यात राज्यातील विक्री झालेल्या ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यात करणार आहे. पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही आहे असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर देखील दिले आहे. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले,राज्यातील ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात अमित शहा यांना आज पत्र लिहणार आहे. साखर कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असेल तर यामध्ये सर्वांची चौकशी झाली पाहिजे, मग भाजपचे नेते असले तरी त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही आहे असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते अजित पवार.. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य करताना सुंदरबाग सोसायटीने याबाबत याचिका दाखल केली होती. त्यात १४ कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यापूर्वी सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन झालं नाही. सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्यासंदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार असून वकिलांचा सल्ला घेत अपिल करतील. 

चंद्रकांत पाटलांनी याआधी पण लिहिलं होतं अमित शहांना पत्र... उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलं होतं. या पत्रावरून आघाडी सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. त्यात पुन्हा एकदा पाटील शहा यांना पत्र लिहिणार आहे. या पत्रात ते राज्यातील विक्री झालेल्या ५४ साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणार आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणAmit Shahअमित शहा