भोर : वातावरण प्रदूषित करणाऱ्या कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे वृक्षारोपण, वृक्ष संगोपन मोहीम वन विभागाने हाती घेतली आहे. याबरोबरच ३३ टक्के वनीकरण, कॅम्पाअंर्तगत कामाचे पालन, कर्मचारी प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास, सेवा हमी कायदा व महितीचा अधिकार यांची अंमलबजावणी केल्यामुळे उपविभागीय वन अधिकारी भोर यांच्या कार्यालयाला आयएसओ ९००१-२०१५ मानांकन मिळाले आहे.सहयोगी फायनान्शियलचे मॅनेजमेंटचे मार्केटिंग प्रमुख श्याम महल यांच्या हस्ते उपविभागीय वनअधिकारी बी. पी. जाधव यांनी आयएसओ प्रमाणपत्र स्वीकारले. या वेळी वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पुणे वनवृत्तांतर्गत भोर शहरातील उपविभागीय वन अधिकारी कार्यालयाची सर्टिफिकेशन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने परीक्षण करून शासनाच्या वतीने सहयोग फायनान्शियल मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड या संस्थेने २ महिने विविध तपासणी करून अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेऊन आयएसओ ९००१-२०१५ प्रमाणपत्र प्रदान करण्याची प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी भोर उपविभागीय वन अधिकारी कार्यालयाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. पुणे विभागातील मुख्य वनसंरक्षक कार्यालय, वन विभाग कार्यालय पुणे, वन उपविभागीय कार्यालयाला आयएसओ मानांकन देऊन गौरव करण्यात आला.तापमानातील वाढ आणि वायुप्रदूषण या गंभीर समस्यांनी मानवी जीवनच नव्हे, तर जीवसृष्टीच्या अस्तित्वासमोर मोठे आव्हन उभे राहिले आहे. या आव्हानाला तोड देण्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन हाच प्रभावी मार्ग आहे. त्या दृष्टीने वन विभागाने जनजागृती आणि जनसहभागातून सामाजिक, शैक्षणिक संस्था यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे उपविभागीय वन अधिकारी बी. पी. जाधव यांनी सांगितले.
भोर वन अधिकारी कार्यालय आयएसओ
By admin | Published: March 31, 2017 11:46 PM