शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

दार उघड बया आता दार उघड, पोतराजाच्या नशिबी उपेक्षिताचे जिणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 2:08 AM

कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात दिसू लागल्याने फक्तटीव्ही, पुस्तकामध्ये पाहिलेला पोतराज खराखुरा कसा असतो, तो पाहण्यासाठी सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या बालचमूची झुंबड उडत आहे.

कदमवाकवस्ती : कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात दिसू लागल्याने फक्तटीव्ही, पुस्तकामध्ये पाहिलेला पोतराज खराखुरा कसा असतो, तो पाहण्यासाठी सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या बालचमूची झुंबड उडत आहे. पुणे शहरापासून अगदी जवळचा हा भाग असल्याने इथे काही वर्षांपासून शहरीकरण झपाट्याने वाढत गेले. त्यामुळे लहान मुलांना पोतराज हा फक्त टीव्ही किंवा पुस्तकातच दिसत होता.ग्रामीण भागातील लोकांच्या श्रद्धेला आधार देणारा हा पोतराज आता विरळ होत चालला आहे. श्रद्धेच्या नावावर पोटासाठी चाबकाचे फटके अंगावर मारून घेतो, कोणताही सण असो पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात ठिकठिकाणी घरोघरी फिरणाऱ्या पारंपरिक पोतराजाचे कुटुंबीय आजच्या स्पर्धेच्या व आधुनिकतेच्या युगात पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.पूर्वी ठिकठिकाणी आवर्जून दिसणाऱ्या पोतराजाच्या नशिबी मात्र सध्या उपेक्षिताचे जिणे आले आहे. मरिआई, कडकलक्ष्मी किंवा मरिबाई जेवढी कडक, उग्र असल्याचा समज आहे, तेवढाच तिचा भक्त पोतराजही कडक व उग्र वाटतो. लांब वाढलेले जटा झालेले केस, कपाळाला मळवट, चेहरा व त्वचा रापलेली, कमरेला विविध रंगांच्या कापडांचं बनविलेलं कमरेचं वस्त्र, त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ आणि हातात आसूड असा त्याचा वेश असतो. त्याच्यासोबत असणारी बाई डोक्यावर मरिआईचा गाडा घेऊन हाताने ढोलकं वाजवीत असते. ढोलक्याच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचा सलग ध्वनी निर्माण करत दुसºया बाजूला ठेका वाजवला जातो. तो वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी मनात वेगळंच, गूढ वातावरण तयार करतो. या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो.

टॅग्स :Puneपुणे