आरोग्य विभाग,
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष,
डोर्लेवाडी : डोर्लेवाडी ( ता. बारामती ) चिकनगुनिया, डेंग्यू साथीचा ग्रामीण भागत चांगलाच उद्रेक झाला आहे. जगभरात कोरोनाच्या साथीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असतानाच मधेच चिकनगुनिया, डेंगू या साथीने ग्रामीण भागात डोके वर काढले चिकनगुनिया, डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच ग्रामीण भागामध्ये चिकनगुनिया, डेंग्यू आणि सर्वांशी डोकेदुखी ठरलेला व्हायरल ताप यांचे रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे एकाला ताप आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होत आहे. डोर्लेवाडी व येथील परिसरात मागील महिन्यापासून हातापायाला सूज येणे, ताप येणे, अंगदुखी सांधेदुखी अशी लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
कोरोनाच्या साथीने चांगलेच थैमान घातले असताना यात चिकनगुनिया, डेंगू साथीने आपले डोके वर काढले आहे. ग्रामीण भागात याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. गावात रोज २० ते २५ आढळून येत असल्याचे खाजगी दवाखान्यात सांगितले जात आहे. प्रशासन हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उपाययोजना करण्यात व्यस्त असतानाच यात चिकनगुनिया, डेंगू या साथीचा मोठा उद्रेक होताना दिसत आहे. डोलेर्वाडीकर हे चिकनगुनिया, डेंगू या सारख्या रोगांनी फणफणले आहेत. घरटी एक किंवा दोन रुग्ण आढळून येत आहेत. परंतु ग्रामपंचायत आरोग्य विभाग यंत्रणा मात्र सुस्त दिसत आहेत. कोणत्याही प्रकारची गावामध्ये फवारणी केली जात नसल्याचे आढळून येत आहे. प्राथमिक आरोग्य विभागाच्या मार्फत ही कोणत्याही प्रकारची उपयोजना केलेली या ठिकाणी दिसून येत नसल्याचे याठिकाणी चिन्हे आहे. चिकनगुनियामुळे लोकांना उठणे बसने देखील कठीण झाले. यामुळे लोकांचे सांधे मोठ्या प्रमाणावर दुखत आहे. या साथीचा डोलेर्वाडी मधील वैदवस्ती या ठिकाणी सर्वात जास्त या साथीचा फैलाव झालेला आहे.
------------------
चिकणगुणया सारख्या रोगाची साथ आता आपल्या ग्रामीण भागात आलेली आहे. प्रत्येक लक्षणे असणाºया रुग्णांची टेस्ट केली असतात त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह येत आहे. अशा रुग्णांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत व पुरेशी विश्रांती घ्यावी व्यवस्थित औषधे घेतल्याने हा आजार कमी होतो.
- डॉ.समृद्धी शहा
--
मार्च अखेर असल्याने कर गोळा करण्यावर जास्त भर आहे. पैशा अभावी पाणीपुरवठा योजना सतत बंद होत आहे. त्यामुळे वसुली चालू असल्याने गावामध्ये दुसरीकडे लक्ष देण्यासाठी सध्यातरी वेळ नाही
- बाळासो सलवदे
सरपंच, डोर्लेवाडी
------------------------