शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

चाकण बाजारात कांद्याची दुप्पट आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:55 AM

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये चाकण बाजारात कांद्याची आवक दुपटीने वाढून भावात घसरण झाली.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये चाकण बाजारात कांद्याची आवक दुपटीने वाढून भावात घसरण झाली. बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली. भुईमूग शेंगा व लसणाचे भाव स्थिर राहिले. तरकारी बाजारात हिरवी मिरची व टोमॅटोची आवक घटली.टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, ढोबळी, दोडका, कारली, वालवडचे भाव वाढले. तर वाटाणा व शेवग्याचे भाव घटले. मेथी व कोथिंबिरीची आवक घटून भावही घटले. जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हशी वशेळ्या-मेंढ्यांची विक्री वाढली. बाजारातील एकूण उलाढाल ३ कोटी १० लाख रुपये झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक ८०६० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक दुपटीने वाढून कमाल भाव १०० रुपयांनी घटून ९०० रुपयांवर स्थिर राहिला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ११५० क्विंटल झाली. बटाट्याचा कमाल भाव १०० रुपयांनी वाढून १४०० रुपयांवर स्थिर राहिला. भूईमुग शेंगाची आवक ५ क्विंटल होऊन भाव ५००० रुपयांवर स्थिर झाले. लसणाची एकूण आवक ८ क्विंटल होऊन लसणाचा कमाल भाव २ हजार रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ३१५ पोती आवक झाली. मिरचीला २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची १ लाख १५ हजार जुड्यांची आवक होऊन ३०१ ते १४१५ रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर ५० हजार जुड्यांची आवक होऊन २५१ ते २८०१ रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक १४ हजार जुड्या झाली. ४०१ ते ७०१ असा जुड्यांना भाव मिळाला.शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा - एकूण आवक - ८०६० क्विंटल. भाव क्रमांक १ : ९०० रुपये, भाव क्रमांक : ७०० रुपये, भाव क्रमांक ३ : ४०० रुपये. बटाटा - एकूण आवक - ११५० क्विंटल. भाव क्रमांक १ : १४०० रुपये, भाव क्रमांक २ : ११०० रुपये, भाव क्रमांक ३ : ७०० रुपये. भुईमूग शेंग - एकूण आवक - ५ क्विंटल. भाव क्रमांक १ : ५००० रुपये, भाव क्रमांक २ : ४५०० रुपये, भाव क्रमांक ३ : ३००० रुपये. लसूण - एकूण आवक - ८ क्विंटल. भाव क्रमांक १ : २००० रुपये, भाव क्रमांक : १५०० रुपये, भाव क्रमांक ३ : १००० रुपये.फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागांना मिळालेलेभाव पुढीलप्रमाणे : हिरवी मिरची - ३१५ पोती ( १५०० ते २५०० रु. ), टोमॅटो - ७२५ पेट्या ( ८०० ते १४०० रू. ), कोबी - २१५ पोती ( ३०० ते ६०० रू. ), फ्लॉवर - ३१२ पोती ( ८००ते १४०० रु.), वांगी - २२५ पोती( २५०० ते ३५०० रु.), भेंडी -३६३ पोती ( २५०० ते ३५०० रु.), दोडका - १८० डाग ( ३००० ते ४००० रु.), कारली - २१० डाग (३००० ते ४००० रु.), दुधीभोपळा - १२५ पोती ( ७०० ते ११५० रु.), काकडी - २१५ पोती ( १५०० ते २५०० रु.), फरशी - ६० पोती ( ३००० ते ४००० रु.), वालवड - १९४ पोती ( २५०० ते ३५०० रु.), गवार - १६२ पोती ( ३०००ते ४००० रू.), ढोबळी मिरची - ३३२ डाग ( २००० ते ३००० रु.), चवळी - ९५ डाग ( १५०० ते २५०० रु. ), वाटाणा - ५७५ पोती ( १५०० ते २५०० रु. ), शेवगा - ७० डाग ( ३००० ते ४५०० रुपये).बटाटा आवक घटून भावात वाढ.भुईमूग शेंगा व लसणाचे भाव स्थिर,तरकारी बाजारात हिरवी मिरची व टोमॅटोची आवक घटली.टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, ढोबळी, दोडका, कारली, वालवडचे भाव वाढले. वाटाणा, शेवग्याचे भाव घटले.मेथी व कोथिंबिरीची आवक घटून भावही घटले,जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हशी व शेळ्या-मेंढ्यांची विक्री वाढली.पालेभाज्या :- चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : -मेथी - एकूण १६४२० जुड्या ( ५०० ते १००० रुपये ), कोथिंबीर - एकूण १९६७० जुड्या ( ७०० ते १२०० रुपये ), शेपू - एकुण ३८५० जुड्या ( ५०० ते ८०० रुपये ), पालक - एकूण ५२७५ जुड्या ( ४०० ते ६०० रुपये ).जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७५ जर्शी गायींपैकी ३५ गार्इंची विक्री झाली. ( १०,००० ते ६०,००० रुपये) २३० बैलांपैकी १४० बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ३५,००० रुपये), २७० म्हशींपैकी १९० म्हशींची विक्री झाली. (२०,००० ते १,००,००० रुपये ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ११३४० शेळ्या - मेंढ्यांपैकी १०६९० शेळ्या-मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना (१५०० ते १०,००० ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात २ कोटी ५० लाख रुपये उलाढाल झाली.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार