तामिळनाडूतील कांदिथाम्पेत्ताई या खेड्यात बालासुब्रमण्यम् यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. भरपूर कष्ट घेत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले, ते लष्करात भरती झाले. लष्करातील २८ वर्षांच्या कालावधित त्यांनी १९६५ च्या युद्धात आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तानच्या युद्धात सहभाग घेत त्यांनी साहस दाखवले. त्यानंतर आयएमडीआर येथून डीबीएम अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, त्यांनी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथून एमबीए केले. सिम्बायोसिसच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. यासोबतच ते सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांनी श्री बालाजी सोसायटी ही स्वत:ची शिक्षण संस्था सुरू केली. व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिल्याने त्यांना मानद कर्नल हा किताब देण्यात आला होता.
डॉ. ए. बालासुब्रमण्यम् यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:15 AM