डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, तळसंदे, कोल्हापूर या कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत अक्षय बाळू गायकवाड याने येथील शेतकरी भरत चव्हाण यांच्या शेतीस भेट देऊन कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती ग्रामस्थांना दिली.या अभियानांतर्गत शेतीतील माती परीक्षण,बदलती पीक पद्धती,सेंद्रिय शेती,आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, बी बियाणे, औषध फवारणी आदींची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी प्रात्यक्षिक देताना प्रा. डी. एन.शेलार, जी. वाय. व्ही.पाटील, डॉ. के. एस.शिंदे, डॉ. एस. एम. घोलप, प्रा. एस. आर. सूर्यवंशी, प्रा. आर. आर.पाटील आदींनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच ज्योती संतोष जाधव,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे, माजी जि. प.सदस्य दादासो कोळपे, ग्रा. सदस्य नरेंद्र माने,पोलिस पाटील शीतल गायकवाड यांनी केले.
डॉ. डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर कॉलेज यांच्या वतीने कृषी जागरूकता अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:08 AM