पुणे : पुण्यातील मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर यांना दोन युरोपियन पेटंट प्राप्त झाले आहेत. एक पेटंट शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा लवकर भरून काढण्यासाठी तयार केलेल्या हर्बल कंपोझिशनसाठी आणि दुसरे छोट्या किडनी स्टोन आणि त्याचा पुन्हा होणारा त्रास रोखण्यावरील उपचार यासाठी मिळाले आहे. पाटणकर यांना २०१५ मध्ये दोन अमेरिकन व एक भारतीय पेटंट देखील मिळाले आहे.सध्या जगभरातील ३७०८० पेटंटसपैकी ३०९९ पेटंटस हे स्वतंत्ररित्या व्यक्तींच्या नावावर आहेत. त्यातील ७०-८० टक्के पेटंटस हे चिनी पारंपारिक औषधांशी निगडीत आहेत. भारत आज ही पारंपरिक औषधांवरील संशोधनात मागे आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पारंपरिक औषधांबद्दलचा ज्ञानाचा साठा आहे, तो अजूनही सर्वांना परिचित नाही, अशी खंत पाटणकर यांनी व्यक्त केली.
पुण्यातील डॉ. सुरेश पाटणकर यांना युरोपातील दोन पेटंट, भारत पारंपरिक औषधांवरील संशोधनात मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 2:00 AM