पुणे : कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर आलेल्या बंदीने आर्थिक हलाखीत सापडला आहे. तमाशा कलावंतांना मदत करून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.
प्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन ११ हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.
आघाडीचे सदस्य अतुल बहुले, फुरसुंगीचे माजी सरपंच आप्पा कसबे यांच्या उपस्थितीत मंगला बनसोडे व नितीन बनसोडे यांनी या मदतीचा स्वीकार केला. पत्रकार विशाल लोखंडे, विजय भुजबळ यावेळी उपस्थित होते. आम्ही जयंतीचा खर्च टाळून ही मदत केली. आता गावोगावच्या यात्रा, जत्रा आहेत. त्यावरही कोरोनामुळे बंदी आहे. त्यामुळे गावांमधील उत्सव कमिट्यांनी खर्च टाळून आपल्या कार्यक्षेत्रातील कलावंतांना अशीच मदत करावी, तमाशा कलावंतांचे समाज प्रबोधनाचे काम लक्षात घेऊन सरकारनेही त्यांना मदत करावी, असे आवाहन अतुल बहुले यांनी केले.
फोटो : वंचित विकास आघाडीने तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांंना आर्थिक मदत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.
(फोटो - तमाशा कलावंत नावाने आहे.)