शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
4
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
5
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
6
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
7
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
8
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
9
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
10
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
11
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
12
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
13
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
14
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
15
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
16
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
17
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
18
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
19
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

जुन्नरच्या समृद्ध वनसंपदेत डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांचे मोलाचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:12 AM

पश्चिम घाट परिसरातील वनस्पतीशास्त्रीय अभ्यासाचे ऐतिहासिक संदर्भ : डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांचे योगदान खोडद : जुन्नरच्या समृद्ध वनसंपदेत भारताचे ...

पश्चिम घाट परिसरातील वनस्पतीशास्त्रीय अभ्यासाचे ऐतिहासिक संदर्भ : डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांचे योगदान

खोडद : जुन्नरच्या समृद्ध वनसंपदेत भारताचे पहिले वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांचे अभूतपूर्व असे मोलाचे योगदान आहे. डॉ. गिब्सन यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जुन्नरला पर्यावरणीयदृष्ट्या एक वेगळी उंची व एक ओळख मिळाली आहे. डॉ. गिब्सन यांनी निर्माण केलेल्या हिवरे बुद्रुक येथील या उद्यानाचा मागोवा घेतल्यास अनेक वैविध्यपूर्ण बाबींची माहिती समोर येते.

जुन्नर तालुक्यातील वैविध्यपूर्ण जैवसंपदेकडे अनेक वनस्पती शास्त्रज्ञ ब्रिटिश काळापासून आकर्षित होत गेले आहेत. जुन्नर तालुक्यातील निरगुडे येथे पहिले जिल्हा उद्यान ऍग्री-होर्टिकल्चर सोसायटी वेस्टर्न इंडिया यांनी स्थापन केले व ९ जुलै १८३८ मध्ये डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांना सुप्रीटेंडन्ट म्हणून नियुक्त केले. त्यांनतर अनेक वनस्पती शास्त्रज्ञांनी या भूप्रदेशात काम केले व येथील वनस्पतींचा अभ्यास केला.

डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांची नियुक्ती जुन्नर येथे झाल्यावर आपल्या वनस्पती शास्त्राच्या विपुल अनुभवाच्या जोरावर हिवरे बुद्रुक येथे बोटॅनिकल गार्डन स्थापन करण्याची कल्पना मांडली. या उद्यानासाठी कुकडी नदीजवळ वर्तुळाकार जागा निवडली. या उद्यानाची आखणी करताना वेगवेगळ्या अधिवासातील वाढणाऱ्या प्रजाती वाढवण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी मर्यादित जागेत असलेल्या बागेत वैविध्यपूर्ण पर्यावरणीय अनुकूलतेसह यशस्वीपणे आंब्याची लागवड केली होती.

हिवरे बुद्रुक येथील उद्यानाच्या नदीकडच्या बाजूला जांभूळवर्गीय वनस्पती, करंज, आंबा, उंबर, भेरलीमाड, पुत्रंजीवी, रुद्राक्ष यांची लागवड केली. बागेच्या मध्यभागी पानझडी वनस्पती कोशिंब, मोह, सीतेचा अशोक, गोरखचिंच, लोखंडी, हिरडा, बेहडा, चिंच इत्यादी वनस्पतींची लागवड केली होती. कोरड्या उंच परिघीय भागामध्ये हिंगणबेट, बोर, सावर, खैर, हिवर, मोई यासारखे वृक्ष लावले. ज्या जागेत बाभूळ व बोर याशिवाय काहीही नव्हते, अशा जागेत आवक दुर्मीळ वनस्पतींची लागवड करून जवळपास १८ एकर जागेत हिवरे उद्यान उभे केले व तेथील वृक्षराजीचा संपूर्ण कायापालट केला. जंगलातील सदाहरित वृक्ष राजी व सूक्ष्म हवामानातील बदल हे स्थानिक वातावरणात १०० हून अधिक काळ कृत्रिम प्रकारे बदल घडविणारे होते.

सन १९४२ पर्यंत वनखात्याने येथील वृक्षराजी सांभाळण्याचे प्रयत्न करत ६० विविध प्रकारच्या वनस्पती जपल्या. या दरम्यान कुकडी प्रकल्पात हे उद्यान गेले, तरी १९६५ पर्यंत या उद्यानात ५ एकरमध्ये १४५० मोठ्या वृक्षांची व अनेक लहान वनसंपदेची नोंद होती. यामध्ये प्रामुख्याने ६७६ चिंच, १९३ बुचाची झाडे, ८१ कळंबाची झाडे, ६६ सुबाभूळ, ४८ तरवडाच्या कुळातील वृक्षांची नोंद मिळते. त्यातील मोहगणी वृक्ष आजदेखील आपल्याला पाहायला मिळत आहे. याशिवाय करंज, कोशिंब, आवळा, बोर, साग, आंबा, रिठा, शिवण, बहावा अशा विविध वनस्पतींची नोंद त्याकाळी असल्याचे सविता रहांगडाले यांनी सांगितले.

"हिवरे उद्यानाचा बराचसा भाग कुकडी प्रकल्पात गेल्यानंतर उद्यानाची पुन्हा नव्याने रचना करण्यात आली. आज जरी डॉ. गिब्सन आपल्यात नसले तरी त्यांनी लावलेली वृक्षराजी आपणास अनेक गोष्टींची आठवण करून देते. निरगुडे येथे आपल्याला त्यांनी लावलेल्या लिची वनस्पतीचे वृक्ष दिसतात, याचा असाच अर्थ आहे की परदेशी वनस्पतीसाठी जुन्नरचे वातावरण अनुकूल आहे. येथे स्थानिक वनस्पतींबरोबरच परदेशी वनस्पतीदेखील उत्पन्न देऊ शकतात."

- डॉ. सविता संजयकुमार रहांगडाले,

प्राध्यापिका, बाळासाहेब जाधव महाविद्यालय, आळे

मानद वनस्पती शास्त्रज्ञ, वनविभाग जुन्नर