पुणे : ज्येष्ठ समीक्षक आणि कुसुमाग्रज यांचे बंधू प्रा. केशव रंगनाथ शिरवाडकर (वय 92) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. दोन मुली अमेरिकेहून भारतात दाखल झाल्यानंतर बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरवाडकर हे साहित्यसमीक्षक होते, त्यांनी मराठीत विपुल वैचारिक लेखन केले आहे.
तो प्रवास सुंदर होता : कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर - (जीवन आणि साहित्य) (चरित्रग्रंथ), मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा, विल्यम शेक्सपिअर - जीवन आणि साहित्य, संस्कृती, समाज आणि साहित्य, सार गीतारहस्याचे, साहित्यातील विचारधारा आदी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने भरवलेल्या पहिल्या साहित्य समीक्षकांच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. संस्कृती, समाज आणि साहित्य’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा ना. गो. नांदापूरकर पुरस्कार प्राप्त झाला होता.