दरवर्षी कोरेगाव भीमा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने व धुमधडाक्यात साजरी होत असते. यासाठी सर्व समाजबांधव एकत्र येत सामाजिक एकोपा व बांधिलकी जपत जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत होती. येथील जयंतीमध्ये आनंद शिंदे, भीम जलसा, भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात यायचा व मोठमोठे बॅनर लावण्यात यायचे पण यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली सामाजिक बांधिलकी जपत जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे जयंती साधेपणाने साजरी करावी, असे अावाहन ज्येष्ठ समाजबांधवांनी केले होते. त्यानुसार जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, घोडगंगेचे कैलास सोनवणे, शिवसेनेचे अनिल काशीद , माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्य केशव फडतरे, महेश ढेरंगे ,मा. ग्रा.पं. सदस्य उमेश गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गवदे, संपत गव्हाणे, सचिन कडलक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र गवदे. यांनी तर आभार ग्राम पंचायत कर्मचारी सुरेंद्र भांडवलकर यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयियान शिल्पकार तरुण मंडळाने केले होते.
१४ कोरेगाव भीमा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवर.