शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Dr.Narendra Dabholkar Murder Case : ‘सनातन’शी संबंधित ५ जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 2:51 PM

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यासाठी १५ सप्टेंबरला सुनावणी

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी ८ वर्ष पूर्ण झाली. मात्र, अद्यापही या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर एक न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यास मुदत देण्याची विनंती केली असून न्यायालयाने ती मान्य केली आहे. तसेच दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींवर १५ सप्टेंबरला दोषारोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

गुन्हा मान्य आहे का? अशी विचारणा न्यायालयाने आरोपींना केली. मात्र कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळण्याची विनंती सचिन अंदुरे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी केले. पाच आरोपींपैकी एक आरोपी न्यायालयात उपस्थित नसल्याने दोन आरोपींनी केलेली मुदतवाढीची विनंती मान्य करीत न्यायालयाने १५ सप्टेंबरला आरोपींवर दोषारोप निश्चित केला जाईल, असे सांगितले. मात्र, आरोपींना आणखी मुदत वाढ देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील  डॉ. वीरेंद्र्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींवर मंगळवारी (दि. ७) दोषारोप निश्चिती करण्यात येणार होते. त्यासाठी अंदुरे, डॉ. तावडे, अ‍ॅड. पुनाळेकर हे व्हिडीओ कॉन्स्फरन्सद्वारे उपस्थित होते. भावे स्वत: हजर होता. तर कळसकर तांत्रिक अडचणींमुळे हजर राहू शकला नाही.  न्यायालय वारंवार आरोपीना गुन्हा मान्य आहे का? अशी विचारणा करीत होते. आजच गुन्हा निश्चिती व्हायला हवी असे न्यायालय वारंवार सांगत होते. परंतु,  कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे आरोप निश्चितीला मुदत मिळण्याची विनंती अंदुरे आणि डॉ. तावडे यांनी केली. आरोपींना त्यांच्या नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधण्याचे नियोजन करून देण्यात येईल. याप्रकारची न्यायालय ऑर्डरही काढेल. मात्र एक आठ्वड्यानंतर पुन्हा तारीख दिली जाणार नाही. केस लवकर चालवावी लागेल असे सांगत विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनीच आरोपींचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांना कोणती तारीख देऊ, अशी विचारणा केली. त्यावर 15 सप्टेंबरवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सीबीआयच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी कामकाज पाहत आहेत.

या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे, कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत. तर अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत. तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून अँड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत.-------------------------------------------------------------------------------------------------------अ‍ॅड. पुनाळेकर यांच्यावर केवळ पुरावा नष्ट केल्याचा आरोप अ‍ॅड. पुनाळेकर यांच्यावर या प्रकरणात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) कारवाई करण्यात आली होती. मात्र गुन्हा २०१३ मध्ये घडला आहे. तेव्हा अँड. पुनाळेकर यांचे नाव या गुन्ह्यात नव्हते, असे नमूद करीत न्यायालयाने केवळ पुरावा नष्ट केल्याच्या आरोपानुसार अँड. पुनाळेकर यांच्याविरोधात आरोपी निश्चित करण्याचे आदेश दिले.------------------------------------------------------------------------दोन्हीकडे कसा अर्ज करता येईल? न्यायालयाचा सवालडॉ. तावडे यांनी या गुन्ह्यात जामिनासाठी सत्र आणि उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. सत्र न्यायालयातील अर्ज हा अंतिम सुनावणीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे त्यावर सुनावणी घेण्याची मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली.मात्र सत्र आणि उच्च अशा दोन्ही न्यायालयात एकाच वेळी जामिनासाठी अर्ज कसा करता येईल? असा सवाल न्यायालयाने केला.

टॅग्स :PuneपुणेNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस