उत्कर्ष प्रकाशन साहित्य प्रेमी मंडळातर्फे आकाशाशी जडले नाते या कार्यक्रमात भुर्के बोलत होते. या वेळी प्रकाशनचे सु. वा. जोशी, दीपक जव्हेरी, गीता भुर्के उपस्थित होते.
वयाच्या २१ व्य वर्षी रँग्लर झालेल्या डॉ. नारळीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबर विज्ञाननिष्ठा जोपासण्यासाठी सोप्या भाषेत विज्ञान कथा लिहिल्या. परदेशात मोठ्या प्रमाणात संधी असूनही ते भारतात परत आले, असे भुर्के म्हणाले.
---
रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे : आम्ही प्राण प्रतिष्ठान शहर संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. एकूण १११ जणांनी रक्तदान केले. उद्घाटन तानाजी लोहकरे यांनी केले. या वेळी नगरसेवक धीरज घाटे, सूरज लोखंडे, रवींद्र धारिया, सतीश बुटाला, गिरीश शहा आदी उपस्थित होते. मुकेश पोटे, निवेदिता शेठ यांनी आयोजन केले.
--
मौलाना अबुल कलाम आझाद यांना श्रद्धांजली
पुणे : स्वातंत्र्य सेनानी भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे तैलचित्रास हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी शहराध्यक्ष याशीं शेख, निसार खान, सलीम मुल्ला, मुझफ्फर सय्यद, असिफ खान, असलम मिराजकर उपस्थित होते.
---
फास्टॅग वापरणे वाहनचालकांच्या हिताचे
पुणे : टोलवसुलीसाठी फास्टॅग प्रणालीचा वापर करणे हे वाहनचालकांच्या हिताचेच आहे. या प्रणालीचा वापर केला तर मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांनी व्यक्त केले. शहर पोलीस व श्री विद्या उत्तेजक ट्रस्ट आयोजित ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अनिल गांधी, योगिता अत्तरदे, हर्षद अभ्यंकर, डॉ. सतीश देसाई उपस्थित होते.
---
शिवजयंतीनिमित्त स्केटिंग रॅली
पुणे : हिल साईड जिमखाना, टीम हिलसाईड स्केटर्स, समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट, के. एस.डी. स्केटर्स यांच्या वतीने शिवजयंती निमित्त स्केटिंग रोड रॅली आयोजन केले. यावेळी मुक्त नेत्र तपासणीचे वाटप करण्यात आले. विराज घुले, जयंत हिरे, राज्य दुधाने, अर्चना पाटील, कीर्ती ढोमणे, सुनील ढोमणे उपस्थित होते.
--
ज्येष्ठ नागरिकांनी साजरी केली शिवजयंती
पुणे : सहयोग फाउंडेशनचे पूना जेरियॉटिक केअर सेंटरमधील ज्येष्ठ नागरिकांनी शिवजयंती साजरी केली. शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून जयंती साजरी केली. यावेळी ज्येष्ठांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा केली होती. भगव्या पताकांनी तोरणे तयार केली होती. यावेळी गीता काळे, भाग्यश्री जाधव, संस्थापक संतोष कानशेट्टे, दीपाली कनशेट्टे उपस्थित होते.