पुणे : गेल्या पाच दिवसांपासून संपावर असलेल्या ससूनमधील निवासी डॉक्टरांनी आपला बंद मागे घेतला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच सर्व निवासी डॉक्टर कामावर रुजू झाले. तत्पूर्वी, मुंबईत मुख्यमंत्र्याशी सुमारे तासभर झालेल्या चर्चेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्यव्यापी संप मागे घेतला. पुण्यातही डॉक्टरांनी संप मागे घेतल्याची माहिती आयएमए, पुणेचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी दिली. त्यामुळे सर्व वैद्यकीय सेवा पुन्हा खुल्या करण्यात आल्या. मात्र, ससूनमधील निवासी डॉक्टरांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवत आम्ही संपावर नसून सामूहिक रजांवर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ससूनमधील वैद्यकीय सेवा विस्कळीतच आहे. राज्यभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ ससून सर्वोपचार रुग्णालयातील सुमारे ३०० निवासी डॉक्टरांनी गेल्या तीन दिवसांपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाने सुरक्षेबाबत तातडीने पावले उचलण्याचा निकाल दिल्यानंतरही लेखी आश्वासन मिळत नाही आणि सुरक्षेच्या उपायांची अंमलबजावणी होत नाही, तोवर कामावर रुजू न होण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी कायम ठेवला होता. निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली. मार्डने संप मागे घेण्याची घोषणा केली असली, तरी सामूहिक रजेच्या निर्णयाशी मार्डचा कोणताही संबंध नाही, असे निवासी डॉक्टरांतर्फे सांगण्यात आले. रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने आणि प्रशासानाचा निषेध म्हणून दुपारी २.३० ते ५ या वेळेत सुमारे १००-१२० निवासी डॉक्टरांनी रक्तदान केले. दरम्यान, रुग्णांची गैैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाकडून २५ वैैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांची ससूनमध्ये नेमणूक करण्यात आली होती. रुग्णालयामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा आणि शस्त्रक्रिया सुरू होत्या. प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकही रुग्णसेवेसाठी रुजू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ससूनचे निवासी डॉक्टर रुजू
By admin | Published: March 25, 2017 4:14 AM