पुणे : तब्बल २४ वर्षानंतर हवेली बाजार समितीच्या निवडणूक लागण्याने यंदाची निवडणूक ही सर्वांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. एकुण १८ जागांसाठी १७ हजार ८१२ जण मतदान करणार आहेत. सर्वाधिक सेवा सहकारी संस्था गटातून ११ उमेदवार आहेत. ग्रामपंचायात गटातून ४ तर व्यापारी-आडते गटातून २ आणि हमाल- मापाडी गटातून १ उमेदवार निवडूण येणार आहेत. यासाठी ५७ उमेदवार रिंगणात असून कोण बाजी मारणार विजय कोणाचा होणार याकडे मात्र सध्या सर्वाचे लक्ष लागले आहे. मार्केटयार्ड मध्ये व्यापारी- आडते २ जागेसाठी १२ उमेदवार असून १३ हजार १७४ सर्वाधिक मतदान आहे. तर हमाल- मापाडी १ जागेसाठी ५ उमेदवार रिंगणात असून २ हजार ०७ मतदान आहेत. २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २९ एप्रिल ला मतमोजणी होणार आहे. या चुरशीच्या निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे मात्र सर्वाचे लक्ष लागले आहे.
रविवारी मार्केटयार्डात मोठया प्रमाणात शेतकरी,व्यापारी, ग्राहक वर्ग मोठया प्रमाणात येत असतात. त्यामुळे उमेदवारांना मतदार पर्यत पोहचणे सोयीचे होते. यामुळे उमेदवारांनी आज प्रतार फेरी, पत्रक वाटप, चिन्ह,कामाचा आवाहल देत निवडणूक प्रचार जोरावर भर दिला. उमेदवारांनी बाजारात येणा-या मतदाराच्या गाठीभेटी कल घेत प्रचार करीत आहेत.
यामध्ये हमाल- मापाडी मतदारसंघासाठी कामगार वर्गाची अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष, कामगारनेते डॉ. बाबा आढाव यांनी उमेदवार जाहीर केला. त्यानंतरही हमाल पंचायतसह समितीच्या इतर सलग्न संघटनांनी निवडणुकीत उमेदवार देऊन आपला वेगळा झेंडा फडकविला आहे. यामध्ये पाच उमेदवारांना कपाट, मोटार गाडी, दूचाकी, शिट्टी, किटली असे चिन्ह जाहीर केले आहे. यामुळे कपाट, किटली कि शिट्टी वाजणार याकडे मात्र सर्वाचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अस्तित्व पणाला लागले असून वेगवेगळ्या चर्चेला वळण लागले आहे. कामगारनेते डॉ. बाबा आढाव यांनी जाहीर केलेला उमेदवार निवडून येणार का ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.