लोकमत न्यूज नेटवर्ककामशेत : पवन मावळातील करुंज बेडसे गावाच्या हद्दीत बुधवारी सकाळी बेडसे लेणीच्या पायथ्याजवळ अजगर आढळून आला. त्याने चार वर्षांच्या भेकराला गिळल्याचे स्थानिक नागरिक संतोष दहिभाते यांच्या निदर्शनास आले होते. वन्यजीव रक्षक -मावळ संस्थेचे नीलेश गराडे यांना अजगराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांना याबाबतची माहिती कळविली. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी मंगेश सकपाळे, वन रक्षक आफरीन गुलबर्गेवाला, राम गुडे, गायकवाड, गफूर शेख यांनी अनिल आंद्रे, गणेश फाळके, किरण मोकाशी यांच्या मदतीने घटनास्थळी गेले. त्यावेळी १३ फूट लांबीचा व ६० ते ७० किलो वजनाच्या इंडियन रोक पायथन जातीच्या अजगर दिसून आला त्याने भेकर गिळले होते. काही कालखंडानंतर अजगराने उलटी केली. त्यातून मृत भेकर बाहेर पडले. हे भेकर चार वर्षांचे होते. अजगराचीही तपासणी करण्यात आली असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली दडके यांनी दिली.
अजगराने गिळले भेकर
By admin | Published: July 06, 2017 3:17 AM